एम. एससी. शिष्यवृत्ती योजना

मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आधार आणि प्रोत्साहन मिळावे ह्या उद्देशाने २०१६  पासून मराठी विज्ञान परिषदेने शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. (भौतिकशास्त्र/गणित किंवा संख्याशास्त्र /रसायनशास्त्र/जीवशास्त्र {वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री}) किंवा एम.ए.(गणित/संख्याशास्त्र) ह्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. शिष्यवृत्तीसाठी  प्रत्येक विषयातील दोन विद्यार्थांची निवड करण्यात येते. एम.एस.सी./एम.ए.च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात.  पात्रता निकष  आणि अर्ज  संकेत स्थळावर उपलब्ध केला जातो.  संकेत स्थळावर  असलेला  अर्ज  योग्य रितीने भरल्यावर त्यावर  विद्यापीठाचा  शिक्का  आणि  सही घेऊन  निकालांच्या प्रतींसह परिषदेकडे पाठवणे आवश्यक असते. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेनंतर मराठी विज्ञान परिषदेची निवड प्रक्रिया होते आणि निकाल परिषदेच्या संकेत स्थळावर जाहीर केला जातो. 

एम.एस.सी. भाग १  साठी रु. १०,०००/- आणि एम.एस.सी. भाग २ साठी रु.१०,०००/- अशी रक्कम (पात्रता निकषानुसार) देण्यात येते.