मराठी विज्ञान परिषदेने २०१८ हे वर्ष रासायनिक मूलद्रव्यांसाठी निश्चित केले, आणि या विषयाच्या सांगतासमयी सुरू होणारे २०१९ हे वर्ष आंतर्राष्ट्रीय आवर्तसारणी वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाकडून घोषित झाले. वर्षभरात सुमारे २५३च्या आसपास लेख या सदरासाठी प्रकाशित होतात. तोपर्यंत शोधली गेलेली मूलद्रव्ये होती ११८.

२१व्या शतकात शोधल्या गेलेल्या ४ मूलद्रव्यांचे अगदी अलिकडे म्हणजे २०१६ या वर्षातच आयुपॅकने बारसे केले; तत्पूर्वी, १८व्या, १९व्या आणि २०व्या शतकात अनुक्रमे २०, ४९ आणि ३१ मूलद्रव्यांचा शोध लागला होता.

अनुक्रमणिका

हायड्रोजनचे समस्थानिक: ड्युटेरिअम

हायड्रोजन या मूलद्रव्याला दोन समस्थानिके आहेत. त्यातील पहिले ड्युटेरिअम. हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतो (याला हायड्रोजन १ अथवा प्रोटिअम असेही म्हटले जाते) तर ड्युटेरिअममध्ये एक न्यूट्रॉन असतो त्यामुळे त्याचा अणुभार म्हणजेच अणुवस्तुमान वाढते.

हायड्रोजनचे समस्थानिक ट्रिटिअम

हायड्रोजनच्या केंद्रकात न्यूट्रॉनची संख्या दोन असते तेव्हा ते हायड्रोजन-३ (एक प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन) म्हणजेच ट्रिटिअम हे समस्थानिक असते.