बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा

जानेवारी ०१

ऑफलाईन कार्यशाळा : इ. ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी

मराठी विज्ञान परिषद इयत्ता ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा आयोजित करीत आहे. इ. ६वीसाठी वेगवेगळ्या दिवशी दोन मोड्युल्सची आखणी असून ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच मोड्युल असेल. दोन्ही इयत्तांसाठी पूर्णपणे वेगळे प्रयोग आहेत.

या कार्यशाळेत इ. ६वीचा प्रत्येक विद्यार्थी ३५ प्रयोग स्वत:च्या हाताने करेल.
१. रसायनशास्त्र- ७ प्रयोग
२. भौतिकशास्त्र- ७
३. सामान्य विज्ञान- ७
४. वनस्पतीशास्त्र- ७ आणि
५. प्राणीशास्त्र-७

या कार्यशाळेत इ. ९वीचा प्रत्येक विद्यार्थी २२ प्रयोग स्वत:च्या हाताने करेल.

१. रसायनशास्त्र-११
२. भौतिकशास्त्र-११ आणि
३. जीवशास्त्राच्या ३० नमुन्यांचे निरीक्षण करेल

कार्यशाळेची माहिती-
कार्यशाळेत जे प्रयोग करवून घेतले जातात त्यांची निरीक्षण नोंद-पुस्तिका अपेक्षित उत्तरांसह विद्यार्थ्याला घरी न्यायला दिली जाते. या नोंद-पुस्तिकेत विद्यार्थी दिवसभरात केलेल्या प्रयोग-निरीक्षणांच्या नोंदी करतो. यामध्ये सराव परीक्षेचाही समावेश आहे. कार्यशाळेत कोविड-१९ संदर्भात शासनघोषित मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाणार आहे. इ. ६वीच्या कार्यशाळेसाठी इ. ५वी आणि ७वीचे, तर इ. ९वीच्या कार्यशाळेसाठी ८वीचे इच्छुक विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

इ. ६वी आणि ९वीच्या एका दिवसाच्या कार्यशाळेचे शुल्क रु. १५००/- आहे.

इयत्ता ६वी :
१. कालावधी
: सकाळी ११ ते संध्या. ५ – एकूण ६ तास
२. शुल्क : प्रतिदिनी रु. १५००/-
३. प्रयोगांची संख्या : ३५ (रसायनशास्त्र-७, भौतिकशास्त्र-७, सामान्य विज्ञान-७, वनस्पतीशास्त्र-७, आणि प्राणीशास्त्र-७)
४. विषय : रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र


इयत्ता ९वी :
१. कालावधी : सकाळी ११ ते संध्या. ५ – एकूण ६ तास
२. शुल्क : प्रतिदिनी रु. १५००/-
३. प्रयोगांची संख्या : प्रयोग २२ (रसायनशास्त्र-११, भौतिकशास्त्र-११ आणि जीवशास्त्रातील ३० नमुने निरीक्षणासाठी)
४. विषय : रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र

Share the post    
Share