विज्ञाननिबंध स्पर्धा २०२२

मे २४ अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट, २०२२

वर्ष १९६७पासून दरवर्षी घेतल्या जाणार्‍या या स्पर्धेत विद्यार्थी गट आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करून विभागीय विजेत्यांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जातात. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात. वर्ष २०१६पर्यंत या स्पर्धेची पारितोषिके प्रा. चिंं. श्री. कर्वे यांच्या नावे देण्यात येत होती.

विज्ञानिबंध स्पर्धा २०२२

स्पर्धेचे नाव – वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा
कोणासाठी – विद्यार्थी गटासाठी आणि खुल्या गटासाठी
कोणत्या कारणासाठी – विज्ञान विषयातील निबंध लिखाणासाठी
पारितोषिकाची रक्कम – विभागीय पातळी
विद्यार्थी गट – प्रथम क्रमांक रु ८००/-, द्वितीय रु. ४००/-
खुला गट – प्रथम क्रमांक रु १०००/-, द्वितीय रु. ५००
राज्यपातळी विद्यार्थी गट प्रथम क्रमांक रु. २०००/- द्वितीय क्रमांक रु. १,५००/-.
खुला गट प्रथम क्रमांक रु. २,५००/-, द्वितीय क्रमांक रु. २,०००/-.

नियम आणि अटी-

 • विद्यार्थी गट : इयत्ता बारावीपर्यंतचे विद्यार्थी.
 • खुला गट : इयत्ता बारावीपुढचे विद्यार्थी आणि प्रौढ.
 • एकाच गटात दोनदा पारितोषिक मिळाले आहे, अशा व्यक्तीस पुन्हा पारितोषिक दिले जाणार नाही.
 • निबंधांसाठी शब्दमर्यादा १५०० ते २००० अशी आहे. तसेच, कागद ए-४ आकाराचाच वापरावा.
 • स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छुकांनी ऑनलाइन पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे.
 • पूर्वनोंदणी करण्यासाठीचा अर्ज खाली दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये योग्य प्राथमिक माहिती सादर करावी – https://mavipa.org/science/activity/competition/nibspa/
 • हाती लिहिलेल्या निबंधाच्या प्रत्येक पानाचा फोटो अथवा स्कॅनिंग सुस्पष्ट आणि वाचनीय असेल, ही काळजी स्पर्धकाने घ्यावी. कोणतेही लिखाण कापले जाणार नाही, उलटसुलट, आडवे-तिडवे, खूप लांबून घेतलेले फोटो, अशा बाबी टाळाव्यात. लिखाण नीट वाचता येईल आणि फोटोमध्ये सावली येणार नाही, असेच फोटो घ्यावेत.
 • निबंध JPG /PDF स्वरूपात officer1.vidnyan@mavipa.org आणि officer1.vidnyan@mavipa.org ह्या ई-मेलवर पाठवावा.
  स्पर्धकाने पहिल्या पानावर आपले पूर्ण नाव, पिनकोडसह पोस्टाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल लिहावा. निबंध पीडीएफ स्वरूपात पाठविल्यास पहिल्या पानाची पीडीएफ स्वतंत्र असावी. याचाच अर्थ, निबंधाची पीडीएफ आणि पहिल्या पानाची पीडीएफ वेगवेगळी असावी.
 • निबंधाचे लिखाण सुटसुटीत व ठळक असावे अथवा ते संगणकीय टाइप केलेले असावे, पृष्ठ क्रमांक सुस्पष्ट असावा. निबंधाच्या मध्ये कुठेही स्पर्धकाचे नाव आढळल्यास निबंध स्पर्धेतून बाद केला जाईल.
 • स्पर्धेसंबंधी परिषदेचा निर्णय अंतिम राहील.
 • दोन्ही गटांचे निबंध प्रथम भौगोलिक-विभाग पातळीवर तपासले जातील. भौगोलिक विभाग पुढीलप्रमाणे –
  • मुंबई व कोकण (जिल्हे – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग).
  • दक्षिण महाराष्ट्र (जिल्हे – अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर).
  • उत्तर महाराष्ट्र (जिल्हे – नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार).
  • मराठवाडा (जिल्हे – औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर व उस्मानाबाद).
  • विदर्भ (जिल्हे – बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली).
  • बृहन्महाराष्ट्र (महाराष्ट्राबाहेरचे सर्व स्पर्धक).
 • मराठी विज्ञान परिषदेकडे निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट, २०२२.
 • भौगोलिक-विभागस्तरावर निबंधांचे परीक्षण करून, त्यातून दोन्ही गटांतून – गुणानुक्रमे – प्रत्येकी दोन निबंध निवडले जातील.
 • या निवडलेल्या निबंधांतून राज्यस्तरीय पातळीवर अंतिम परीक्षण करून प्रत्येक गटातून दोन निबंध निवडले जातील.
 • स्पर्धेचा निकाल मराठी विज्ञान परिषदेच्या www.mavipa.org ह्या संकेतस्थळावर दि. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जाहीर केला जाईल.
 • अंतिम परीक्षणानंतर दोन्ही गटांतील विभागीय विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिके दिली जातील :
  • शालेय गट – प्रथम क्रमांक रु ८००/-, द्वितीय रु. ४००/-
  • खुला गट – प्रथम क्रमांक रु १०००/-, द्वितीय रु. ५००/-
 • राज्यपातळी अंतिम विजेते पारितोषिके पुढीलप्रमाणे – विद्यार्थी गट प्रथम क्रमांक रु. २०००/- द्वितीय क्रमांक रु. १,५००/-. खुला गट प्रथम क्रमांक रु. २,५००/-, द्वितीय क्रमांक रु. २,०००/-.
 • विभागीय तसेच अंतिम प्रमाणपत्रे ई-मेल आणि पारितोषिके इंटरनेट बँकिंग पद्धतीने पाठविली जातील, ह्याची नोंद घ्यावी.

बक्षीस कधी देण्यात येते ?

मराठी विज्ञान परिषदेचे वार्षिक अधिवेशन साधरणपणे नोव्हेंबर अथवा डिसेंबर मध्ये घेण्यात येते. या अशिवेशनात स्पर्धेचे निकाल जाहीर केले जातात तसेच याच वेळेस परिषदेच्या संकेत स्थळावरून निकाल जाहीर होतात.

स्पर्धेचा इतिहास

१९६७ सालापासून ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेची विभागणी विद्यार्थी गट आणि खुला गट अशी करण्यात आली आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करून विभागीय विजेत्यांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जातात. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात.

मागील वर्षीचे विजेते – २०२१

विद्यार्थी गट – विषय: कोरोनापासून मी काय शिकलो?
प्रथम क्रमांक – कु. गौरी सातपुते (नागपूर)
द्वितीय क्रमांक – कु. आर्या सप्रे (रत्नागिरी)
खुला गट – विषय: कोरोनाचे जाणवणारे दीर्घकालीन परिणाम
प्रथम क्रमांक – श्रीमती अश्विनी कुलकर्णी (नागपूर)
द्वितीय क्रमांक – श्रीमती आकांक्षा पाटील (पन्हाळा, कोल्हापूर)

Share the post    
Share