शहरी शेती ओळखवर्ग

ऑक्टोबर ०२ सकाळी १०.३० वा. मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

(घनकचरा विनियोगाचा उत्पादनाभिमूख मार्ग म्हणजे शहरी शेती!)
कुणासाठी? : सर्वांसाठी
‘शहरी शेती ओळखवर्ग’ हा उपक्रम ऑक्टोबर १९९४पासून परिषदेमध्ये सुरू असून, शक्यतो दरमहा पहिल्या रविवारी घेतला जातो. या तंत्राने विकसित केलेला ‘शहरीशेती बगिचा’ (क्षेत्रफळ १२० चौ.मी.) परिषदेच्या विज्ञान भवनाच्या गच्चीवर आहे. सहकारी निवासी संकुले / समाजसेवी संस्था यांच्या मागणीनुसार स्वतंत्र वर्गाचे आयोजनप्रत्यक्ष (मराठी वा इंग्रजीतून) घेण्याचीही सोय आहे.

अधिक माहिती :
गच्ची, बाल्कनी, ग्रील किंवा इमारतीच्‍या परिसरात, किमान चार तास सूर्यप्रकाश मिळू शकेल अशा ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्‍हणजेच ‘शहरी शेती’. डॉ. रमेश दोशी यांनी पेटंट घेतलेल्या व ठोस शास्त्रीय बैठक असलेल्या या तंत्राचा वापर आपण विनामूल्य करू शकतो, याचे श्रेय डॉ. दोशी यांना द्यायला हवे. या तंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही रासायिनक खते / कीटकनाशके न वापरता, ही शेती काँक्रिटच्या अथवा मातीच्या पृष्ठभागावर करून उत्पादन घेता येते. त्याशिवाय घराघरात निर्माण होणाऱ्या जैविकदृष्ट्या विघटनशील कचऱ्याच्या वापरामुळे पाण्याचीही बचत होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागतो. घरगुती आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून, वनस्पती वाढीचा अभ्यास करत यामार्गाने भाज्या, फळे यांचे उत्पादन मिळवण्याचा आनंद ‘शहरी शेती’द्वारे घेता येतो. ह्या तंत्रातील बारकावे, तसेच परिषदेने विकसित केलेल्या वेगळ्या उपायांची माहिती या ओळखवर्गात दिली जाते. हे तंत्र समजण्यास सहज व सोपे असल्याने किमान शिक्षित असलेली कोणीही व्यक्ती या वर्गात सहभागी होऊ शकते.
या ओळखवर्गाचे शुल्क प्रतिव्यक्ती रु. ३००/- असून त्यामध्ये ‘शहरी शेती कशी करावी?’, (ले. दिलीप हेर्लेकर) या पुस्तकाची प्रत विनामूल्य दिली जाते. अन्यथा हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असून मराठीसह इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीदेखील उपलब्ध आहे; मूल्य अनुक्रमे रु. ६०/-, ७०/- आणि ८०/-.

ओळखवर्गाचे वैशिष्ट्य : या ओळखवर्गाचा लाभ घेतलेल्या अनेक व्यक्ती ‘शहरी शेती’चा अवलंब करीत आहेत. शिवाय, त्यांचा ‘व्हॉट्सॅप’ ग्रुप कार्यरत असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात सल्ला-मसलत आणि नवनवीन प्रयोगांविषयी देवाण-घेवाण होते.

त्वरा करा, ओळखवर्गासाठी नोंदणी करा आणि इतरानांही या अभ्यासवर्गाची माहिती द्या!

Share the post    
Share

शहरी शेती ओळखवर्ग

"*" indicates required fields

वर्ग दिनांक*