मधुमेह व रक्तदाबाशी करूया सामना

ऑक्टोबर १५ दि. १५ व १६ ऑक्टो - सायं. ६ ते ७.१५ वा. ऑनलाईन (गुगल मीट माध्यम)

‘आरोग्य व्याख्यानमाले’अंतर्गत मधुमेह व रक्तदाबाशी करूया सामनाया विषयांवर मार्गदर्शन

आपल्या घरात तसेच आजूबाजूला मधुमेह आजाराने पिडीत असलेले अनेक रुग्ण आढळतात. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो, ही एक खेदाची गोष्ट आहे. मधुमेह प्रकार-१ आणि प्रकार-२ या श्रेणीतील रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. पूर्वी मधुमेह म्हटलं की लोकं घाबरून जायचे, आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बर्‍यापैकी जागरुकता आली आहे. तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या आजही सामान्य लोकांना माहीत नाहीत आणि याच गोष्टींवर आरोग्य व्याख्यानेमालेअंतर्गत मधुमेह व रक्तदाबाशी करूया सामना या विषयांवर दि. १५ आणि १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं. ६ ते ७:१५ या वेळेत डॉ. परितोष बघेल गुगल मीट माध्यमावर ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाची लिंक (शनिवार व रविवार) खालीलप्रमाणे आहे.
Video call link: https://meet.google.com/oue-jfpb-etz

डॉ. परितोष बघेल

सल्लागार डॉक्टर, एस एल रहेजा व फोर्टीज रुग्णालय, माहीम, मुंबई

वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि वैद्यकशास्त्र गटाचे प्रमुख, सर जे. जे. समुह रुग्णालये व ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय, भायखळा, मुंबई

Share the post    
Share