• कार्यक्रम
  • राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – अंतिम फेरी

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – अंतिम फेरी

नोव्हेंंबर ०५ सकाळी १० ते सायं. ६ वा. साहित्य मंदिर, वाशी, नवी मुंबई

अंतिम फेरी

दि. ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वा.
स्थळ : साहित्य मंदिर, वाशी, नवी मुंबई

 

विज्ञान प्रसाराचं ‘अनोखं’ माध्यम

प्रा. ज्येष्ठराज ऊर्फ जे. बी. जोशी यांची २०१४ साली मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे नवीन उपक्रम हाती घेण्यात आले, त्यापैकी एक म्हणजे राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा! मराठी माणसाचे नाट्यवेड लक्षात घेत, त्याचा वापर विज्ञान प्रसार कार्यासाठी करावा, अशी नाविन्यपूर्ण कल्पना, परिषदेचे अध्यक्ष प्रा. जे. बी. जोशी यांनी मांडली. या कल्पनेचं स्वागत आणि २०१५साली परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ती अमलात आणली गेली. मराठी विज्ञान परिषद आणि सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा शैक्षणिक आणि खुला अशा दोन गटांमध्ये घेतली जाते. या निमित्ताने शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीतील एखादा प्रसंग वा विज्ञानकथेत मांडलेली एखादी संकल्पना रंगमंचावर बघायची संधी मिळते. त्याव्यतिरिक्त सामाजिक कळीचे विषयही हाताळले जाणे, ही या स्पर्धेची मोठी उपलब्धी आहे. आतापर्यंत अनेक देशी-विदेशी शास्त्रज्ञांच्या कार्यावर आधारित एकांकिका सादर झाल्या असून डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे यांच्या विज्ञान कथांवर आधारित विज्ञान एकांकिकांचा समावेश या स्पर्धांमध्ये असतो. या स्पर्धेचे हे आठवे वर्ष असून महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचा सहभाग मिळवणारी ही स्पर्धा, विज्ञान आणि नाट्य यांचा सुरेख संगम आहे.
या स्पर्धेकरिता श्री. रवींद्र ढवळे (कार्यकारिणी सदस्य, मविप) यांच्या संपर्कातून नाट्यक्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी परीक्षक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभली तद्वतच परिषद करत विज्ञान प्रसाराचे काम कलाक्षेत्रात पोहोचण्यास मदत झाली. परीक्षकांनी ह्या स्पर्धेचे कौतुक तर केलेच, त्याशिवाय या स्पर्धेतून विज्ञान नाटक, विज्ञान एकांकिकांचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्यामुळे हा उपक्रम योग्य दिशेनं पुढे जात असल्याचे द्योतक आहे.

Share the post    
Share