राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा
ऑगस्ट ०१ अर्ज करण्याची अंतिम दिनांक १ ऑगस्ट, २०२२

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२२
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे हे आठवे वर्ष असून प्रतिवर्षीप्रमाणे ‘मराठी विज्ञान परिषद’तर्फे राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२२ आयोजित करण्यात येत आहे. ‘वैज्ञानिक आणि शोध’ (कथेमध्ये वैज्ञानिकाने केलेले संशोधन, त्यामध्ये आलेल्या अडचणी यांवर विशेष भर असावा), ‘विज्ञान कथा’, वैज्ञानिक दृष्टिकोण, विज्ञानाधारीत कल्पनाविलास असे विषय या स्पर्धेत हाताळले जाऊ शकतात. यात अंधश्रद्धा, सण आणि त्यामागील विज्ञान हे विषय वगळले आहेत.
शैक्षणिक गट- इयत्ता ८वी ते १२चे विद्यार्थी
खुला गट- वरीष्ठ महाविद्यालय (वयाची अट नाही) आणि नाट्यसंस्था
प्रवेशशुल्क आणि प्रवेशिका भरण्याचा अंतिम दिनांक : १ ऑगस्ट, २०२२
प्रवेशशुल्क ₹ ५००/- वेळेत, येथे ऑनलाइन भरणे अनिवार्य
प्राथमिक फेरीसाठी चित्रफीत पाठवण्याचा अंतिम दिनांक: १ सप्टेंबर, २०२२