विज्ञान कथाकथन (Science Fiction Narration)

फेब्रूवारी ०५ दुपारी ३ ते ४ वा. ऑनलाईन

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मराठी विज्ञान परिषदेने गुरू नानक खालसा कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय माटुंगा, मुंबई येथील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कथाकथन (Science Fiction Narration)  या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले आहे. शनिवार, दि. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत कॅ. सुनील सुळे या कार्यक्रमामध्ये इंग्रजीतून विज्ञान कथाकथन करणार आहेत. ते सध्या खांडपे कर्जत येथील अँगलो इस्टर्न मॅरिटाइम आकादेमी या संस्थेचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. मराठी आणि इंग्लिश्मध्ये लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी त्यांनी अनेक कथा लिहिल्या आहेत. त्याशिवाय ते मराठी आणि हिंदीमध्ये कविता लेखन,  आकाशवाणीसाठी विज्ञानविषयक लेखन आणि कथाकथनाचे कार्यक्रम करीत असतात.

Share the post    
Share