विज्ञान कथालेखन शिबीर

जून २४ सकाळी ११ ते ५ वा. मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

विज्ञान कथालेखन शिबीर (२०२२)

१९७० सालापासून मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान रंजन कथा स्पर्धा आयोजित केल्या असून हा उपक्रम आज ५० वर्षानंतरही जोमात चालू आहे. या स्पर्धेत बक्षिसे मिळवलेल्या डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे, रेखा बैजल, मेघश्री दळवी, सुधा रिसबूड यांनी नंतरच विज्ञान कथा लिहून मराठी साहित्यातील हे दालन समृध्द केले आहे. अनेक दिवाळी अंकात आज विज्ञान कथांचा समावेश आवर्जून केला जातो. त्या मागे मराठी विज्ञान परिषदेचे योगदान निश्चितच आहे.

पहिल्या पिढीतील डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके हे कथा लेखक आता ऐंशी वर्षाच्या पुढे गेले आहेत, इतर लेखकांनी सत्तरी-पंचाहत्तरी पार केलेली आहे. त्यामुळे मराठी साहित्यातील विज्ञान कथेचा प्रवाह ओघवता राहण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेने गेली दहा वर्षे राज्यभरात व बाहेर मिळून नऊ कार्यशाळांचे आयोजन मराठी विज्ञान परिषदेत, तसेच एस.एन.डी.टी. (मुंबई), गोवा, अमरावती, नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी त्या-त्या विद्यापीठांच्या सहकार्याने आयोजित केल्या असून त्या कार्यशाळांचा लाभ अंदाजे ५०० होतकरू लेखकांनी घेतला आहे.

दिनांक २४ ते २६ जून २०२२ या कालावधीत मराठी विज्ञान परिषद, मुंबई येथे होणाऱ्या कार्यशाळेत २४ व्यक्ती भाग घेतील. या कार्यशाळेत त्यांच्याकडून  विज्ञान कथा लिहून घेतली जाईल आणि विज्ञानकथा लेखकांचे त्यांना मार्गदर्शन मिळेल.

सदरहू कार्यशाळा सशुल्क (रुपये ९९९/- प्रत्येकी) असून  त्यामध्ये चहा, भोजन. साहित्य इत्यादीचा समावेश आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींच्या निवासाची सोय परिषदेतर्फे केली जाईल.

सोबतचा अर्ज व फी भरून नोंदणी करावी.

Share the post    
Share

मर्यादित जागेची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे, नोंदणी बंद आहे.