विज्ञान प्रयोग मेळा

मे ०२ सकाळी १०:०० ते दुपारी ३:३० वा. श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती, शिवाजी पार्क, दादर, मुंबई

मराठी विज्ञान परिषद आणि श्री. उद्यानगणेश मंदिर सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ मे २०२२ रोजी श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीशिवाजी पार्कदादर, मुंबई येथे सकाळी १०:०० ते दुपारी ३:३० या वेळात विज्ञान प्रयोग मेळा आणि विज्ञान पुस्तक प्रदर्शन तथा विक्री यांचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात उष्णता, प्रकाश, गुरूत्वमध्य, रासायनिक अभिक्रिया, हृदयाचे ठोके या आणि इतर विषयावरील प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. हा प्रयोग मेळा खास विद्यार्थांसाठी असला तरीही सर्वांसाठी खुला आहे. या विज्ञान मेळ्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

इच्छुक व्यक्ती सोयीनुसार १०:०० ते दुपारी ३:३० या कालावधीत केव्हाही एक तास येऊन प्रयोग करू शकतील.

 

 

Share the post    
Share