• कार्यक्रम
  • बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा (Young Scientist Practical Workshops)

बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा (Young Scientist Practical Workshops)

जानेवारी ०८ सकाळी ११ ते ५ वा. मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा

६वी विद्यार्थ्यांसाठी – दिनांक : १५ जानेवारी, २०२३
९वी विद्यार्थ्यांसाठी – दिनांक : ८ जानेवारी, २०२३

मराठी विज्ञान परिषद या उपक्रमाद्वारे इयत्ता ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा आयोजित करीत आहे. इ.६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा असून प्रयोगसुद्धा पूर्णपणे वेगवेगळे आहेत.

या कार्यशाळेत इयत्ता ६वीचा प्रत्येक विद्यार्थी ३५ प्रयोग (रसायनशास्त्र-७ प्रयोग, भौतिकशास्त्र-७, सामान्य विज्ञान-७, वनस्पतीशास्त्र-७, प्राणीशास्त्र-७) स्वत:च्या हाताने करतो.

या कार्यशाळेत इयत्ता ९वीचा प्रत्येक विद्यार्थी २२ प्रयोग (रसायनशास्त्र-११, भौतिकशास्त्र-११ आणि जीवशास्त्राचे ३० नमुन्यांचे निरीक्षण) स्वत:च्या हाताने करतो.

कार्यशाळेत जे करवून प्रयोग घेतले जातात त्यांची निरीक्षण-नोंद पुस्तिका अपेक्षित उत्तरांसह विद्यार्थ्याला घरी न्यायला दिली जाते. या नोंद पुस्तिकेत विद्यार्थी दिवसभरात केलेल्या प्रयोग निरीक्षणांच्या नोंदी करतो. या कार्यशाळेमध्ये सराव परीक्षेचा समावेश केलेला आहे. या कार्यशाळेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांची कोविड-१९ संदर्भात योग्य ती दक्षता घेतली जाईल. इच्छुक असल्यास इ.६वीच्या कार्यशाळेसाठी इ. ५वी आणि ७वीचे तर  इ.९वीच्या कार्यशाळेसाठी ८वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इ.६वी आणि ९वीच्या एका दिवसाच्या कार्यशाळेचे शुल्क रु. १५००/- आहे.

इयत्ता ६वी:
१. कालावधी: सकाळी ११ ते संध्या. ५ – एकूण ६ तास
२. शुल्क: रु. १५००/- दर दिवसाला
३. प्रयोगांची  संख्या : ३५ (रसायनशास्त्र-७, भौतिकशास्त्र-७, सामान्य विज्ञान-७, वनस्पतीशास्त्र-७,  आणि प्राणीशास्त्र-७)
४. विषय: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान, वनस्पतीशास्त्र आणि  प्राणीशास्त्र

इयत्ता ९वी:
१. कालावधी: सकाळी ११ ते संध्या. ५ – एकूण ६ तास
२. शुल्क: रु. १५००/- दर दिवसाला
३. प्रयोगांची  संख्या : प्रयोग २२ (रसायनशास्त्र-११, भौतिकशास्त्र-११) आणि जीवशास्त्रातील ३० नमुने निरीक्षणासाठी
४. विषय: (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र)

कृपया सोबतचा अर्ज व शुल्क भरून नोंदणी करावी.

 


 

Young scientist practical workshops

6th standard students – Date : 15th Jan., 2023
9th standard students – Date : 8th Jan., 2023

Marathi Vidnyan Parishad organizes practical workshops for 6th and 9th standard students. 6th and 9th standard students have different batches with different experiments.

6th standard students get hands-on experience of 35 experiments (Chemistry-7, Physics-7, General Science-7, Botany-7 & Zoology-7).

Every student of 9th standard gets hands-on experience of 22 experiments (Chemistry-11, Physics-11) and observation of 30 biological specimens.

Every student gets a workbook to write observations, conclusions & answers for each experiment which can be taken home. Expected answers also included in workbook. These workshops include mock test. Care will be taken considering the ongoing pandemic. Students of 5th & 7th standard can participate in 6th standard workshops and 8th standard students can participate in 9th standard workshops. Fees of one day workshop for 6th and 9th standard students is Rs. 1500/-.

Standard 6th:
1. Duration: 11 am to 5 pm – 6 hours
2. Fees: 1500/- per day
3. No. of Experiments: 35 (Chemistry-7, Physics-7, General Science-7, Botany-7 & Zoology-7).
4. Subjects: Chemistry, Physics, General Science, Botany & Zoology.

Standard 9th:
1. Duration: 11 am to 5 pm – 6 hours
2. Fees: 1500/- per day
3. No. of Experiments: 22 experiments (Chemistry-11, Physics-11) & 30 biological specimens for observation.
4. Subjects: Chemistry, Physics, Biology.

Please register by attached form and paying fee.

Share the post    
Share