सभासदत्व

‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या मासिकाचा विज्ञान प्रसारात मोठा वाटा आहे. वैज्ञानिक जगतात घडणाऱ्या घडामोडींची सोप्या भाषेत ओळख करून देण्याच्या उद्देशाने चालवल्या जाणाऱ्या या लोकप्रिय मासिकाचे आजवर ५७२ अंक प्रकाशित झाले आहेत. सध्या दरमहा ८००० प्रती वितरित होतात.

परिषेदेचे आजीव सभासदत्व घेतल्यास आपलाही परिषदेच्या या विज्ञान प्रसाराच्या कार्यास हातभार लागणार आहे. तेव्हा आपण परिषदेचे आजीव सभासद व्हावे, ही विनंती. त्यासाठी खाली दिलेला अर्ज भरून परिषदेकडे पाठवावा.

प्रा. ज्येष्ठराज जोशी
अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद

व्यक्ती – सभासदांचे वर्ग

उपकर्ते       : रू. २५,०००/- किंवा त्याहून अधिक
आश्रयदाते  : रू. १०,०००/- किंवा त्याहून अधिक
हितचिंतक  : रू. ५,०००/- किंवा त्याहून अधिक
साधारण    : रू.     १००/- (वार्षिक)
विद्यार्थी     : रू.      ५०/- (वार्षिक)
संस्था सभासदांचे वर्ग

उपकर्ते       : रू. ३०,०००/- किंवा त्याहून अधिक
आश्रयदाते  : रू. १५,०००/- किंवा त्याहून अधिक
हितचिंतक  : रू. १०,०००/- किंवा त्याहून अधिक
साधारण    : रू.       ५००/-  वार्षिक

उपकर्ते, आश्रयदाते, हितचिंतक या वर्गातील सभासद, आजीव सभासद मानले जातील. उपकर्ते, आश्रयदाते (व्यक्ती व संस्था) यांना छापील मविप पत्रिका हे मासिक २० वर्षे पाठवले जाईल. हितचिंतक (व्यक्ती व संस्था) यांना छापील पत्रिका ५ वर्षे पाठवली जाईल. छापील पत्रिकेचा कालावधी संपल्यावर ई-पत्रिका पाठवली जाईल. साधारण व विद्यार्थी सभासदत्व एप्रिल ते मार्च अशा कालावधीसाठी असेल. आजीव / व्यक्ती सभासदत्वासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या कोणाही व्यक्तीस अर्ज करता येईल. विद्यार्थी सभासद वय वर्षे १८पर्यंत होता येईल. सभासद शुल्क एकरकमी भरावी. सभासद शुल्क सोबतचा अर्ज भरून ऑनलाइन पद्धतीने भरता येईल किंवा “मराठी विज्ञान परिषद” / “Marathi Vidnyan Parishad” या नावाने धनाकर्ष (डी.डी.) असावा अथवा संकेतस्थळावरूनही सभासद / मविप पत्रिका वर्गणीदार होता येईल. मुंबईबाहेरच्या बँकेचे फक्त बहुशहरी धनादेश स्वीकारले जातील. नेट बँकिंगद्वारे स्वतंत्र रक्कम भरण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या मासिकासाठी    इथे क्लिक करा

 

उद्देश

 • विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.
 • विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.
 • विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे.
 • वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे.

तुम्ही काय करू शकता?

 • आपल्या जीवनात विज्ञानाधिष्ठीत विचारसरणी अंगिकारणे.
 • परिषदेचे सभासदत्व घेणे / ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका या मासिकाचे’ वर्गणीदार होणे.
 • शाळा, ग्रंथालये यांच्यासाठी मविप पत्रिकेची वार्षिक वर्गणी भरणे.
 • परिषदेच्या कार्यासाठी देणगी देणे. (आयकर कलम ८०-जी अंतर्गत सवलत उपलब्ध)
 • परिषदेच्या कामासाठी आपला काही वेळ नियमितपणे देणे.
 • ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या मासिकातून संपादकांच्या समन्वयाने विज्ञानविषयक लिखाण करणे.
 • मृत्युपत्रात परिषदेच्या नावे निधीची अथवा जागेची तरतूद करणे.

सभासदांचे अधिकार

 • परिषदेच्या साधारण सभांमध्ये भाग घेणे व मत देणे.
 • परिषदेच्या निवडणुकीस, निवडणुकीच्या नियमांनुसार उभे राहणे, मतदारांच्या याद्या बघणे व मत देणे.
 • परिषदेच्या संदर्भालयाचा लाभ घेणे. नियमानुसार कार्यक्रम व अधिवेशनात उपस्थित रहाणे.
 • विद्यार्थी सभासदांना साधारण सभेत मतदान करण्याचा, कार्यकारी मंडळावर व अन्य अधिकृत स्थानावर निवडून येण्याचा अधिकार असणार नाही.

मराठी विज्ञान परिषदेची वाटचाल

मराठीतून विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून दि. २४ एप्रिल, १९६६ रोजी स्थापन झालेल्या मराठी विज्ञान परिषदेने, २०१६मध्ये सुवर्णमहोत्सव साजरा केला. विविध विषयांवरची व्याख्याने, चर्चासत्रे इत्यादी कार्यक्रमांनी कार्याला सुरुवात झाल्यानंतर, परिषदेतील कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. ‘विज्ञान मित्र’पासून ‘संकल्पना विकसन’ अभ्यासक्रमापर्यंतचे अनेक उपक्रम परिषदेतर्फे घेतले जाऊ लागले. विज्ञान खेळणी शिबिरातून विद्यार्थ्यांना ‘हसत-खेळत शिक्षण’ देण्यासही परिषदेतर्फे सुरुवात झाली. बालविज्ञान संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून छोटे प्रकल्प करून घेतले जाऊ लागले. याबरोबरच, विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील शिबिरे, तसेच भविष्यात त्यांनी संशोधनाकडे वळावे म्हणून त्यांच्यासाठी व्याख्याने घेतली जाऊ लागली. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिताही कार्यक्रम सुरू झाले. या सर्व विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांबरोबरच शिक्षकांसाठीही व्याख्याने, प्रात्यक्षिकांसह कृतिसत्रे, संशोधन संस्थांना भेटी असे नाना प्रकारचे कार्यक्रम परिषद घेत आली आहे.

विज्ञान प्रसारात उल्लेखनिय योगदान, कृषितंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण संशोधन, लघुउद्योजकांनी केलेले उपयोजित संशोधन, विज्ञान संशोधनासाठी प्राध्यापकांकरिता एम.एम. शर्मा पुरस्कार, विद्यार्थ्यांकरिता विज्ञान संशोधन पुरस्कार, समाजोपयोगी संशोधनासाठी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार, विज्ञान-पुस्तकांकरिता पारितोषिके इत्यादी पुरस्कारांच्या मार्गाने विज्ञानप्रसार करण्याचे कामही परिषद करत आहे. ‘ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता शनिवारी विज्ञानवारी उपक्रम, वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान अभ्यासक्रम-परिक्षा, लैंगिक शिक्षण, आनंददायी विज्ञान, विज्ञान अनुभूती’ यांसारखे कार्यक्रम, जैव-विघटनशील कचऱ्याचा वापर करून ‘शहरी शेती’च्या माध्यमातून भाज्या व फळांचे उत्पादन घेण्यासंबंधीचे प्रशिक्षण, असे अनेक उपयुक्त उपक्रम परिषद निरंतर करत आली आहे. परिषदेचा वर्धापन दिन आणि वार्षिक अधिवेशन हेही उत्साहाने साजरे केले जाते. या उपक्रमांविषयी परिषदेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.