• Home
  • मराठी विज्ञान परिषद पत्रिका

मराठी विज्ञान परिषद पत्रिका

मराठी विज्ञान परिषदेची स्थापना २४ एप्रिल, १९६६! मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम परिषद आपल्या मुखपत्राद्वारे वर्ष १९६७पासून करत आहे. ‘मराठी विज्ञान परिषद वार्तापत्र’ या नावाने जानेवारी १९६७ ते मार्च १९६८ या काळात सुरू असलेले हे मासिक एप्रिल १९६८ पासून ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या नावाने प्रसिद्ध होऊ लागले. सध्या वर्षभरात ‘मविप पत्रिका’चे ११ मासिक अंक आणि सुमारे १५० ते १७५ पानांचा दिवाळी अंक असे १२ अंक प्रकाशित होतात. दरमहा तत्कालिन विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयांवर लेख यामध्ये समाविष्ट असतात. ‘गंमत-जंमत’ हे मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे चार पानी सदर दर महिन्याला असते. याशिवाय पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा यांचाही अंतर्भाव पत्रिकेत असतो.

पत्रिका वर्गणी तपशील

छापील पत्रिका – वार्षिक वर्गणी :      ₹       ३५०/-  (दिवाळी अंकासहित)
छापील पत्रिका – त्रैवार्षिक वर्गणी :    ₹     १००१/-
छापील पत्रिका – किरकोळ अंक :     ₹         ३०/-

ई-पत्रिका – वार्षिक वर्गणी :              ₹       १५०/-
ई-पत्रिका – २० वर्षांसाठी वर्गणी :     ₹     १०००/-
(२० वर्षासाठी सवलत योजना ३१ डिसेंबर २०२१पर्यंत)

अंक दर महिन्याच्या दि. ३ रोजी पोस्टातून रवाना होतो.
दि. २०पर्यंत अंक मिळाला नाही, तर वाचकांनी दि. २५पर्यंत परिषदेशी दूरध्वनी : ०२२-२४०५४७१४, २४०५७२६८ अथवा ई-मेल : patrika@mavipamumbai.org वर कळवावे; त्यांना अंक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. (कार्यालयीन वेळ ११ ते ५ – मंगळवारव्यतिरिक्त.)

ई-पत्रिकेसाठी सूचना :  ई-पत्रिका दर महिन्याच्या दि. ३ पर्यंत पाठवली जाते. कृपया ई-मेल इनबॉक्स तपासावा, न सापडल्यास इनबॉक्समधील स्पॅम फोल्डर आणि प्रमोशन्स फोल्डरही तपासावे.

Marathi Vidnyan Parishad Patrika july 2021जुलै २०२१
Marathi Vidnyan Parishad Patrika August 2021ऑगस्ट २०२१
Marathi Vidnyan Parishad Patrika march 2021सप्टेंबर २०२१
Marathi Vidnyan Parishad Patrika april 2021ऑक्टोबर २०२१
Marathi Vidnyan Parishad Patrika may 2021डिसेंबर २०२१
Marathi Vidnyan Parishad Patrika may 2021जानेवारी २०२२

सूचना

मराठी विज्ञान परिषद पत्रिकेची वर्गणी ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यासाठी ज्यांच्याकडे कोणतेही साधन/सुविधा नाही, अशा व्यक्ती/संस्था/वाचनालय/शाळा मनीऑर्डर अथवा धनादेशाद्वारे वर्गणी रक्कम मविप कार्यालयाकडे पाठवू शकतात. धनादेश “मराठी विज्ञान परिषद” या नावे असावा.

  • संपूर्ण नाव, घरचा पूर्ण पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती मनीऑर्डर अर्जात नमूद करावी.
  • धनादेशाद्वारे वर्गणी पाठवताना, सोबत संपूर्ण नाव, घरचा पूर्ण पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक, व्यवसाय इत्यादी माहिती एका कागदावर लिहून सोबत जोडावी.

पत्रिका - जानेवारी २०२२


मविप पत्रिका - नोंदणी अर्ज


Join Our Newsletter

Monthly magazine will be made available on 5th day of every month.