श्री. सुधाकर अुद्धवराव आठले विज्ञान प्रसार पुरस्कार

श्री. सुधाकर अुद्धवराव आठले विज्ञान प्रसार पुरस्कार

समाजात वेगवेगळ्या प्रकारे विज्ञान प्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कार्याची दखल घेऊन मराठी विज्ञान परिषदेतर्फे  ‘श्री. सुधाकर अुद्धवराव आठले विज्ञान पुरस्कार’ दरवर्षी दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप रू.२५,०००/- आणि सन्मानपत्र असे आहे. हा पुरस्कार एप्रिल महिन्यात परिषदेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात वितरित केला जातो.

सविस्तर:  

विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवून विज्ञानाधिष्ठित समाज घडविण्यात मराठी विज्ञान परिषदेने योगदान दिले आहे. त्याचबरोबर समाजाची प्रगती विज्ञानामुळेच होणार हा विचार सर्वसामान्य जनतेत रुजविण्याचे कार्य मराठी विज्ञान परिषद करीत आहे. या कार्याचा आवाका खूप मोठा आहे. त्यामुळे समविचारी संस्था अथवा व्यक्ती यांच्या सहकार्याने, तर कधी त्यांना प्रोत्साहन देऊन मराठी विज्ञान परिषदेचे हे कार्य अविरत सुरू आहे.

श्री. सुधाकर अुद्धवराव आठले यांचा जन्म १७ एप्रिल १९२१ यादिवशी मध्य प्रदेशातील खांडवा येथे झाला. वैयक्तीक जबाबदार्‍यांमुळे ज्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसेल तेथे इतर मार्गाने योगदान देऊन त्याची उणीव भरून काढणे हा मार्ग त्यांनी स्वीकारला. कामगार राज्य विमा निगम येथून निवृत्ती स्वीकारल्यावर पुढील आयुष्यात अनेक सामाजिक – राजकीय जबाबदार्‍या त्यांनी स्वीकारल्या आणि प्रामाणिकपणे पूर्ण केल्या. काही काळ विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.

हे सर्व करत असतांना समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे आहे याची जाणीव झाल्याने विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या व्यक्तीचे कौतुक करून त्यास प्रोत्साहन द्यावे या विचाराने मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून श्री. सुधाकर अुद्धवराव आठले विज्ञान प्रसार पुरस्कार योजना त्यांनी सुरू केली.

पुरस्काराचे नियम व अटी:

 • श्री. सुधाकर अुद्धवराव आठले विज्ञान प्रसार पुरस्कार’ असे या पुरस्कार योजनेचे नाव आहे.
 • समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या व्यक्तीस हा पुरस्कार दरवर्षी दिला जाईल.
 • मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र आणि रूपये २५,०००/-, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • ऑनलाईन प्रवेशअर्ज www.mavipa.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये संपूर्ण माहिती भरावी.
 • अर्ज केलेल्या अथवा नामनिर्देशित प्रवेशिकांमधून एका प्रवेशिकेची निवड मराठी विज्ञान परिषदेने नेमलेल्या समितीमार्फत केली जाईल आणि त्या समितीचे निर्णय अंतिम राहतील.
 • एकदा पुरस्कार मिळालेली व्यक्ती पुन्हा या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.
 • ऑनलाईन प्रवेशअर्जाचा अंतिम दिनांक १५ मार्च, २०२२.
 • त्या-त्या वर्षीच्या ३१ डिसेंबरला ६० वर्षां पेक्षा कमी वय असलेली व्यक्ती या पुरस्कारास पात्र असेल.
 • दरवर्षी एप्रिलमध्ये परिषदेचा वर्धापन दिन २५ एप्रिलच्या निकटच्या रविवारी असतो. त्यावेळी हा पुरस्कार प्रदान समारंभ केला जाईल.
 • पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार प्राप्त व्यक्तीने ८ ते १० मिनिटात आपले काम सादर करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार संगणकीय सादरीकरणाची व्यवस्था केली जाईल.
 • बाहेरगावच्या व्यक्तीला वेगळा प्रवास / निवास खर्च दिला जाणार नाही.
 • वरील नियम शिथिल किंवा त्यात बदल करण्याचे अधिकार मराठी विज्ञान परिषदेकडे रहातील.

पुरस्कार विजेते

पुरस्कार विजेते