• मुख्यपृष्ठ
 • भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार


एखाद्या देशाची सुबत्ता वाढते, लोकांचे जीवनमान सुधारते, त्या देशात संपत्ती मोठ्या प्रमाणावर निर्माण होते, तेव्हा तिथे कोणते घटक कार्यरत असतात? अनेक गोष्टींचा उल्लेख करता येईल; आणि त्या सर्व महत्त्वाच्या आहेतच. पण जगातील श्रीमंत राष्ट्रांकडे एक धावती नजर टाकली, तरी लक्षात येईल, की यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’. त्यातली प्रगती, त्यातले संशोधन, नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारावर निर्माण झालेली तंत्रशास्त्रे आणि एकूणच समाजावर असलेला वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रभाव. आपल्या देशालाही सुबत्ता हवी असेल, सर्व-सामन्यांचे जीवनमान सुधारायचे असेल, आत्महत्यांच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका करायची असेल, तर विज्ञान-तंत्रज्ञान हाच मार्ग असू शकतो. खरे तर, त्यासाठी आवश्यक बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे. हुशार विद्यार्थी आहेत. उच्च दर्जाचे संशोधन कौशल्य आहे. चांगल्या प्रयोगशाळा आहेत, विद्यापीठे आहेत. पण विज्ञान-तंत्रज्ञान यांच्या आधारे संपत्ती निर्मिती करण्यातले आपले यश फार मर्यादित आहे.

याचे एक कारण म्हणजे, इथल्या विज्ञान संशोधनाची नाळ इथल्या समाजाशी जुळलीच नाही. संशोधनासाठी घेतलेले प्रश्न एका पातळीवरचे असतात आणि समाजाचे प्रश्न असतात दुसऱ्याच पातळीवर. अशा संशोधनातून तंत्रज्ञान निर्माण होणार कसे आणि संपत्ती निर्माण होणार कशी? पण या परिस्थितीतही काही तंत्रज्ञाने लोकांपर्यंत पोहोचवणारे उत्साही कार्यकर्ते आहेत. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. अशांपैकी एका यशस्वी अभियंत्याला ‘भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार’ देऊन गौरव करण्याचे मराठी विज्ञान परिषदेने ठरविले आहे.

या पुरस्काराची सुरुवात वर्ष २०१८पासून झाली. अभियांत्रिकीतील संशोधनात्मक, समाजोपयोगी काम करणाऱ्या एका व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. रु. १०,०००/-,
स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे स्वरूप आहे.

मराठी विज्ञान परिषदेस मिळालेल्या रु. २ लाखांच्या देणगीमधून परिषद दरवर्षी १५ सप्टेंबर या राष्ट्रीय अभियंतादिनी रु. १०,०००/- चा एक पुरस्कार वर्ष २०१८ ते वर्ष
२०२७ अशी दहा वर्षे देणार आहे.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे श्रेष्ठ अभियंता होते. कर्नाटकातल्या चिक्क-बल्लापूर जिल्हातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर, १८६१ रोजी त्यांचा जन्म झाला. आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम गावचे ते मुळ रहिवासी. प्राथमिक शिक्षण कर्नाटकातील चिक्क-बल्लापूर या खेड्यात आणि पुढे १८८०मध्ये बंगळुरुच्या सेंट्रल कॉलेजमधून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परंतु विशेष गुणवत्तेत बी.ए. उत्तीर्ण. बंगळुरुहून बी.ए. झाल्यावर पुण्याला आले आणि १८८३मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून सिव्हील इंजिनिअर झाले. या परीक्षेत ते तत्कालीन मुंबई प्रांतात पहिले आले. त्यानंतर त्यांनी पहिली नोकरी तेव्हाच्या मुंबई राज्यातील नाशिक, खानदेश आणि पुणे येथे केली. पुण्याला ते खडकवासला धरणावर असताना १९०३मध्ये त्यांनी पावसाळ्यात धरणामध्ये जास्त पाणी आल्याने धरण असुरक्षित होऊ नये म्हणून निर्माण केलेल्या स्वयंचलित स्लुईस गेट्स अद्वितीय ठरल्या व त्यानंतर ग्वाल्हेरच्या तिग्रा आणि म्हैसूरच्या कृष्णराज सागर धरणावर त्या वापरल्या गेल्या. १९०६ मध्ये त्यांनी एडनला पाणी व सांडपाण्याची व्यवस्था करून दिली. हैदराबाद शहराला पूरनियंत्रण योजना तर केलीच पण एरवी जाणवणाऱ्या पाण्याच्या तुटवड्यासाठी उस्मानसागर आणि हुसेनसागर या तलावांची निर्मिती करून दिली, जी आजही उपयोगी पडते. विशाखापट्टणम येथे समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप त्यांनी थांबवली. बिहारमध्ये गंगेवरील मोकामा पुलासाठी त्यांनी काम केले. पुढे ते म्हैसूरचे दिवाण झाल्यावर त्यांनी कावेरी नदीवर कृष्णराज सागर धरण बांधले, म्हैसूर सोप  फॅक्टरी सुरू केली, म्हैसूर आयर्न अँड स्टील  फॅक्टरी सुरू केली,  पॅरॉसिटोल्ड  लॅबोरेटरी, बंगळुरुला जय चामराज पॉलिटेक्निक, कृषी विद्यापीठ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बँक ऑफ म्हैसूर, म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स, कन्नड परिषद अशा संस्था सुरू केल्या. त्यांच्या प्रेरणेने हिदुस्तान एअर क्राफ्ट आणि प्रीमिअर ऑटोमोबाईल या कंपन्या वालचंद हिराचंद ह्यांनी सुरू केल्या. त्यांना १९५५ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अशा या देश घडवणाऱ्या अभियंत्याच्या जन्मदिनी म्हणजे १५ सप्टेंबर या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो.

अधिक माहिती व नियम     Download

पुरस्काराचे नियम :

 • हा पुरस्कार मराठी विज्ञान परिषद पुरस्कृत असून भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांच्या नावे देण्यात येतो.
 • ₹ १०,०००/-, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • अभियांत्रिकीतील कोणत्याही शाखेत संशोधनात्मक समाजोपयोगी काम करणाऱ्या एका व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
 • ऑनलाईन प्रवेशअर्ज https://mavipa.org/science/activity/award/bsmvengg/  या संकेतस्थळावर पृष्ठावर उपलब्ध आहे. या लिंकवर आपल्याला सदर पुरस्काराची माहिती मिळेल. माहितीसोबत असलेले आवेदन अर्थात अर्ज भरावा. हे आवेदन सादर केल्यानंतर आपणास ई-मेल येईल (आपला इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर दोन्ही तपासावे). त्यामध्ये दिलेल्या लिंकचा वापर करून आपण आपली प्रवेशिका भरून सादर करावी. त्यात आपण केलेल्या कामाचे संक्षिप्त तसेच, विस्तृत सचित्र वर्णन असणे आवश्यक आहे.  प्रवेशअर्जात इच्छुक उमेदवाराने संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे.
 • ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ५ सप्टेंबर, २०२२
 • पुरस्कार वितरण समारंभ १५ सप्टेंबरला २०२२ मुंबईतील एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयात होईल. पुरस्कार वितरण समारंभात विजेत्याने ३० ते ४५ मिनिटे आपले काम पॉवर पॉईण्ट प्रेझेण्टेशनद्वारे सादर करणे आवश्यक आहे. विजेत्या व्यक्तीने स्वखर्चाने पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहावे.
 • आलेल्या प्रवेशिकांतून एका प्रवेशिकेची निवड मराठी विज्ञान परिषदेने नेमलेल्या समितीमार्फत केली जाईल व त्या समितीचा निर्णय अंतिम राहील.
 • हा पुरस्कार दरवर्षी साधारणत: १५ सप्टेंबरला चाळीस अथवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या अभियंत्याला दिला जातो.
 • वरील अट / अटी गरजेनुसार शिथिल करण्याचे अधिकार मराठी विज्ञान परिषदेकडे राहतील.

 


Sir Mokshagundam Vishweshvarayya Award in Engineering


What could be the factors responsible when a country prospers, the standards of living improve, or when wealth is created on a large scale? Many things could be responsible, and they are all important. But a quick look at the world’s richest nations would reveal the most important factor is ‘Science and Technology’ and research in it, the innovative concepts and the scientific outlook of the overall society. If we want prosperity, enrichment of common man and to get rid of the farmers of the evils of suicide; Science & Technology alone is the only way for which there isn’t any scarcity of intelligence. We have brilliant students, high-quality research expertise, good laboratories, and universities. But the success of generating wealth based on science-technology is very minimal.

The reason behind this would be, that scientific research is not consistent with the needs of society; the problems selected for research are different from the needs. Under the circumstances, there won’t be a creation of technology from research and wealth as a result! But despite this situation, there are enthusiasts with their technologies reaching out to the society; their work is inspirational. Marathi Vidnyan Parishad has therefore decided to honor such a researcher by awarding him/her an award in the name Sir Mokshagundam Vishweshvarayya, one of the most successful engineers in this country and it will be appropriate to give the award on National Engineers Day i.e., on 15th September every year.

Marathi Vidnyan Parishad has received a donation of ₹ 2 lakh. From this donation, it is decided to give an award of ₹ 10,000/- along with a memento and citation for a research work done for the benefit of society. The award started in the year 2018 and will continue up to the year 2027.

Bharat Ratna Sir Mokshagundam Vishweshvarayya was the finest engineer; Mokshagundam Vishweshvarayya was born on September 15, 1861, in Mudenhalli village, Chikk-Ballapur District in Karnataka. His Native place is Mokshagundam village in the Kurnool area of Andhra Pradesh. Primary education in Chikk-Ballapur in Karnataka and later in 1880 passed BA at Bengaluru’s Central College, in extremely unfavorable conditions but in special excellence. After BA he came to Pune and became a Civil Engineer at the College of Engineering, Pune in 1883. In this examination, he stood first in the then Bombay province. After that, he did his first job at Nashik, Khandesh, and Pune in the then Bombay State. In 1903, when he was on the Khadakvasla dam in Pune, he developed automatic sluice gate valves to prevent the dam from being unsafe due to floods; this became a unique of its kind and was subsequently used on Tighra Dam at Gwalior and Krishnaraja Sagar Dam, Mysore. In 1906, he provided water and sewage arrangements at Aden. While developing flood control schemes for the city of Hyderabad, he also constructed Osmanasagar and Hussainasagar lakes to handle the water scarcity; this is useful even today. He was instrumental in developing a system to protect Vishakhapattanam port from sea erosion. He worked for Bihar’s Mokam bridge on the Ganga River. Later, after being Diwan of Mysore, he built Krishnaraj Sagar dam on the Kaveri river, started the Mysore Soap Factory, started the Mysore Iron and Steel Factory, and institutes like Parasitoid Laboratory, Jay Chamraj Polytechnic, Bangalore University, College of Engineering, Bank of Mysore, Mysore Chamber of Commerce, Kannad Council. With his inspiration, Walchand Hirachand started Hindustan Aircraft and Premier Automobile Companies. He was awarded the Bharat Ratna in 1955.

On the birthday of such eminent Engineer, National Engineers Day is celebrated every year on the 15th of September, throughout India.

More details & Rules     Download

Note

 • This award is instituted by Marathi Vidnyan Parishad (MaViPa) and is given in the name of Bharat Ratna Sir Mokshagundam Visvesvaraya.
 • The award will be ₹ 10,000/- and a memento with a citation..
 • The award is given to a researcher in any Engineering branch who has done beneficial work for society.
 • The last date for filling online admission form is 5th Sept. 2022.
 • The award will be conferred on 15th September 2022 in one of the Engineering Colleges in Mumbai. The awardee will present a PowerPoint presentation of his work in 30 to 45 minutes at the award distribution ceremony. The awardee should attend the award ceremony at his/her own expense.
 • A selection committee constituted will select the awardee from the entries received and its decision will be final.
 • Award will be given to a participant having age up to 40 years on the 15th of September of the respective award year.
 • The right to make any amendment to all the rules is reserved with Marathi Vidnyan Parishad.

 

गतवर्षी विजेते यादी

 

Email(Required)
DD slash MM slash YYYY