विज्ञानपुस्तक लेखन पारितोषिक

मराठी विज्ञान परिषद आणि नाशिक विज्ञानलेखक संघाचे

विज्ञानपुस्तक लेखन पारितोषिक

विज्ञान विषयातील उत्कृष्ठ पुस्तकाच्या लेखकाला हे पारितोषिक दिले जाते. पारितोषिकाचे स्वरूप रू.१०००/- आणि प्रमाणपत्र असे आहे. एप्रिल महिन्यात मराठी विज्ञान परिषदेच्या वर्धापन दिनाचा समारंभ संपन्न होतो.  या समारंभात हे पारितोषिक वितरित केले जाते.

सायन्स फीचर्स, नाशिक यांनी विज्ञान लेखनाच्या कार्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. नाशिकमधील विज्ञान लेखकांच्या सहकार्याने ‘सायन्स फिचर्स हा उपक्रम सुरु केला. वृत्तपत्रातील विज्ञान पुरवणीमध्ये आणि साप्ताहिक पुरवण्यांमध्ये विज्ञान विषयातील साहित्य प्रसिद्ध करण्याचा उपक्रम त्यांनी २५ वर्षे चालवला. या उपक्रमातील गंगाजळी मराठी विज्ञान परिषदेला देणगी म्हणून दिली. या देणगीमूल्यातून मराठी विज्ञान परिषदेने ही योजना २०२१ या वर्षापासून सुरु केली.

पारितोषिकाचे नियम व अटी:

  • पारितोषिक वितरणाच्या आधीच्या दोन वर्षात विज्ञान विषयात जी पुस्तके प्रसिद्ध होतात त्या पुस्तकाच्या लेखकाला हे पारितोषिक देण्यात येते.
  • मराठी विज्ञान परिषदेचे प्रमाणपत्र आणि रूपये १,०००/- असे या परितोषिकाचे स्वरूप आहे.
  • ऑनलाईन प्रवेशअर्ज mavipa.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये संपूर्ण माहिती भरावी.
  • लेखकाने पुस्तकाच्या दोन छापील प्रती मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यालयात पाठवाव्यात. .
  • ऑनलाईन प्रवेशअर्जाचा अंतिम दिनांक १५ मार्च २०२२.
  • दरवर्षी एप्रिलमध्ये परिषदेचा वर्धापन दिन २४ एप्रिलच्या निकटच्या रविवारी असतो. या वर्धापन दिनाच्या समारंभात हे पारितोषिक प्रदान केले जाते.
  • पारितोषिक वितरणाच्या समारंभात विज्ञानपुस्तकाच्या विजेत्या लेखकाने आपले मनोगत ५ मिनिटात श्रोत्यांसमोर मांडावे.
  • बाहेरगावच्या व्यक्तीला वेगळा प्रवास / निवास खर्च दिला जाणार नाही.

वरील नियम शिथिल किंवा त्यात बदल करण्याचे अधिकार मराठी विज्ञान परिषदेकडे राहतील.

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च, २०२२