विज्ञान संशोधन पुरस्कार

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२२)

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा घेतली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित (गणितासह) कोणताही प्रकल्प या स्पर्धेसाठी पाठवता येतो. स्पर्धेसाठी आलेल्या प्रकल्पांतून तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करून, प्रत्येक पुरस्कार विजेत्याला रु. १२,००० इतक्या रकमेचा पुरस्कार देण्यात येतो. हे प्रकल्प ज्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केले गेले असतील, त्या तज्ज्ञालाही रु. २,००० इतक्या रकमेचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. या स्पर्धेचा तपशील आणि स्पर्धेसाठी भरण्याचे ऑनलाईन अर्ज खाली उपलब्ध करून दिले आहेत.

२०२२ वर्षीच्या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर, २०२२

स्पर्धा माहिती, अटी व नियम (मराठी)     Download

Info, Rules & Regulations (Eng) Download

ऑनलाईन अर्ज / Online Application

गतवर्षीच्या विजेत्यांची नावे

गतवर्षीच्या विजेत्यांची नावे