स्पर्धा

विज्ञाननिबंध स्पर्धा

कोणासाठी? : सर्वांसाठी

वर्ष १९६७पासून दरवर्षी घेतल्या जाणार्‍या या स्पर्धेत विद्यार्थी गट आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करून विभागीय विजेत्यांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जातात. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात. वर्ष २०१६पर्यंत या स्पर्धेची पारितोषिके प्रा. चिंं. श्री. कर्वे यांच्या नावे देण्यात येत होती.

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा

कोणासाठी? : सर्वांसाठी

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका या स्पर्धेसाठी सादर करता येते. या स्पर्धेची सुरुवात वर्ष २०१५ पासून झाली.

विज्ञान रंजन कथा स्पर्धा

कोणासाठी? : सर्वांसाठी

विज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हा भाषा-साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पाश्चिमात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच. जी. वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकर, श्री. लक्ष्मण लोंढे, डॉ. बाळ फोंडके आदी लेखकांनी उत्कृष्ट साहित्य निर्माण केलेले आहे. तरीही, मराठी भाषेत विज्ञानरंजन साहित्य कमीच आहे. या कार्याला चालना देण्यासाठी मराठी विज्ञान परिषद १९७०पासून विज्ञानरंजन कथा स्पर्धेचे सातत्याने आयोजन करीत आहे. या स्पर्धेतील कथेला विषयाचे बंधन नाही. वर्ष २०१६ पर्यंत या स्पर्धेची पारितोषिके सौ. सुनंदा वामनराव देसाई यांच्या नावे देण्यात येत होती. वर्ष २०१७ पासून ही पारितोषिके वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर यांच्या नावे देण्यात येत आहेत.

आंतरशालेय समस्यापूर्ती स्पर्धा

कोणासाठी? : शालेय विद्यार्थी