राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका या स्पर्धेसाठी सादर करता येते. या स्पर्धेची सुरुवात वर्ष २०१५ पासून झाली.


राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२२

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे हे आठवे वर्ष असून प्रतिवर्षीप्रमाणे ‘मराठी विज्ञान परिषद’तर्फे राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२२ आयोजित करण्यात येत आहे. ‘वैज्ञानिक आणि शोध’ (कथेमध्ये वैज्ञानिकाने केलेले संशोधन, त्यामध्ये आलेल्या अडचणी यांवर विशेष भर असावा), ‘विज्ञान कथा’, वैज्ञानिक दृष्टिकोण, विज्ञानाधारीत कल्पनाविलास असे विषय या स्पर्धेत हाताळले जाऊ शकतात. यात अंधश्रद्धा, सण आणि त्यामागील विज्ञान हे विषय वगळले आहेत.

शैक्षणिक गट- इयत्ता ८वी ते १२चे विद्यार्थी

खुला गट- वरीष्ठ महाविद्यालय (वयाची अट नाही) आणि नाट्यसंस्था

प्रवेशशुल्क आणि प्रवेशिका भरण्याचा अंतिम दिनांक :  १४ ऑगस्ट, २०२२

प्रवेशशुल्क ₹ ५००/- वेळेत, येथे ऑनलाइन भरणे अनिवार्य

प्राथमिक फेरीसाठी चित्रफीत पाठवण्याचा अंतिम दिनांक: १ सप्टेंबर, २०२२

प्रवेशिका पाठवण्यासाठीची सूचना

१) सर्वप्रथम प्रवेशशुल्क ₹ ५००/- रकमेचा येथे ऑनलाइन भरणा करावा.
२) प्रवेशशुल्क मविपकडे प्राप्त झाल्यावर तुम्ही  नोंदवलेल्या ई-मेलवर (इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर दोन्ही तपासावे) प्राथमिक फेरीसाठी प्रवेशिका पाठवण्याबाबतची माहिती आणि प्रवेशिका अर्जाची लिंक पाठवली जाईल; त्याद्वारे आपली प्रवेशिका पाठवावी.
३) प्राथमिक फेरीचा व्हिडिओ ekankika@mavipa.org या ई-मेलवर गुगल ड्राईव्हवरून शेअर करावा.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत-  कोविड-१९ या महामारीमुळे सर्वच सादरीकरणांवर बंधने आली आहेत; महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित अंतर. सबब, स्पर्धा घेताना आयोजनाच्या स्वरूपात काही बदल आहेत. त्यासंबंधातील सुधारित नियमावली अशी असेल.

  • प्राथमिक फेरी ही व्हिडिओ सबमिशन या मार्गाने केली जाईल. स्पर्धकसंस्थेने एकांकिकेचे चित्रीकरण करून परिषदेकडे दि. ०१ सप्टेंबर २०२२पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी चित्रीकरण केलेल्या व्हिडिओची गुगलड्राईव्ह लिंक, परिषदेच्या ekankika@mavipa.org या ई-मेलवर पाठविणे अनिवार्य आहे. या लिंकवरून सदर व्हिडिओ डाऊनलोड करून घेतला जाईल व पुढे तो स्पर्धेमध्ये सामील केला जाईल.
  • प्राथमिक फेरीसाठी करावयाचे चित्रीकरण हे तालीम स्वरूपातील एकांकिकेचे सादरीकरण असेल. ते कोणत्याही गच्चीवर, हॉलमध्ये किंवा बाहेर पटांगणवजा मोकळ्या जागेत केलेले असू शकते. मुबलक प्रकाशात चित्रीकरण होईल याची दक्षता घ्यावी. कोणत्याही खास प्रकाशयोजनेची गरज नाही किंबहुना विशेष प्रकाशयोजना ग्राह्य धरली जाणार नाही.
  • एकांकिकेचे चित्रीकरण करतेवेळी ते एक नाटक आहे, सिनेमा किंवा शॉर्टफिल्म नाही याचे भान स्पर्धकसंस्थेने ठेवायचे आहे. म्हणजेच सादरीकरणात शॉट ब्रेकअप, विविध अँगल्स, क्लोज्ड अँगल, मिड शॉट, लाँग शॉट इत्यादी स्वीकारले जाणार नाहीत. यासाठी एकाच कॅमेराचा वापर अनिवार्य आहे.
  • कोणत्याही प्रकारचे स्पेशल इफेक्ट्स, टायटल वगैरे असल्यास एकांकिका बाद करण्यात येईल. नाटक हे नाटक हवे, केवळ सद्यपरिस्थितीमुळे आपण ते चित्रीकरण स्वरूपात पडताळत आहोत, याची नोंद घ्यावी.
  • प्राथमिक फेरीसाठी चित्रीकरण कोणत्याही कॅमेऱ्याने केलेले चालेल. मोबाईलसुद्धा ग्राह्य आहे. पण जे दिसेल ते स्पष्ट, फोकस्ड आणि पडताळण्यायोग्य असेल याची जबाबदारी स्पर्धकसंस्थेची असेल.
  • चित्रफितीचे रिझोल्युशन हे ६४०x४८०चे किंवा त्यावरचे कोणतेही चालेल. तसेच ध्वनी हा तालीम सुरू असतानाचाच असावा. डब केलेला ध्वनी स्वीकारला जाणार नाही. हा नियम पार्श्वसंगीताच्या बाबतीतदेखील लागू असेल. थोडक्यात, प्राथमिक फेरीसाठीच्या चित्रफितीमध्ये कोणत्याही प्रकारचे संपादनविषयक (editing) सोपस्कार अपेक्षित नाहीत आणि ग्राह्य होणार नाहीत.
  • प्राथमिक फेरी ही विभागीयपद्धतीनेच घेतली जाईल. तथापि, परीक्षण ३ जणांचे परीक्षकमंडळ मुंबईतच करेल.
  • प्राथमिक फेरीतील विभागांनुसार प्रत्येक विभागातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढले जातील प्रत्येक विभागातून पहिल्या क्रमांकाच्या एकांकिकेची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येईल. तथापि, परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • अंतिम फेरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत प्रत्यक्ष रंगमंचावरील सादरीकरणाद्वारे होईल. तथापि, ही बाब तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल. अंतिम फेरीसुद्धा एकांकिका चित्रित करुन घेतली जाऊ शकते. त्यासाठी असणारे नियम संबंधित संस्थांना योग्यवेळी कळविण्यात येतील.
  • अंतिम फेरीतील पारितोषिकप्राप्त एकांकिका मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर, युट्यूबवर तसेच फेसबूकवर प्रसारित केल्या जातील याची नोंद लेखक आणि स्पर्धकसंस्थांनी घ्यावयाची आहे.

स्पर्धा संयोजक-              रवींद्र ढवळे, ९९२०५७२९७४
स्पर्धा समन्वयक-            सुचेता भिडे, ९२७१५०१३६३
कार्यवाह-                       अ. पां. देशपांडे / दिलीप हेर्लेकर / भालचंद्र भणगे

प्राथमिक फेरीसाठीची पारितोषिके – विभागानुसार प्रत्येक विभागातून
प्रथम क्रमांक                   रु. ३,०००/-
द्वितीय क्रमांक                 रु. २,०००/-
तृतीय क्रमांक                  रु. १,०००/-

अंतिम फेरी सांघिक पारितोषिके
प्रथम क्रमांक                    रु. ३१,०००/-
द्वितीय क्रमांक                  रु. २१,०००/-
तृतीय क्रमांक                   रु. ११,०००/-

पहिल्या तिन्ही संघांना मराठी विज्ञान परिषदेचे स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी     रु. २,५००/-
सर्वोत्कृष्ट अभिनेता             रु. १,५००/-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री             रु. १,५००/-
सर्वोत्कृष्ट नेपथ्य                 रु. १,५००/-
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना      रु. १,५००/-
सर्वोत्कृष्ट संगीत                 रु. १,५००/-
सर्वोत्कृष्ट लेखन                 रु. २,०००/-    (यावर्षीच्या स्पर्धेसाठीच लिहिल्या गेलेल्या एकांकिकेला दिले जाईल).

 

एकांकिका संहितेची निवड करण्यासाठी वा संदर्भासाठी काही पुस्तकांची यादी   Download

संघप्रमुख प्रमाणपत्र नमुना  Download

लेखकाचे प्रमाणपत्र नमुना  Download

 

गतवर्षीच्या विजेत्यांची नावे

गतवर्षीच्या विजेत्यांची नावे