विज्ञाननिबंध स्पर्धा

वर्ष १९६७पासून दरवर्षी घेतल्या जाणार्‍या या स्पर्धेत विद्यार्थी गट आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करून विभागीय विजेत्यांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जातात. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळे विषय दिले जातात. वर्ष २०१६पर्यंत या स्पर्धेची पारितोषिके प्रा. चिंं. श्री. कर्वे यांच्या नावे देण्यात येत होती.

विज्ञानिबंध स्पर्धा २०२१

विद्यार्थी गट (बारावीपर्यंत) विषय : कोरोनापासून मी काय शिकलो?

कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांच्या शाळा चालू होत्या, त्यांनी नवीन माध्यमाशी कसे जुळवून घेतले? प्रत्यक्ष शिक्षक व मित्र समोरासमोर नसताना काही फरक जाणवला का? तुम्हीही टंगळमंगळ किती केली? ह्या पद्धतीमुळे विषय एरव्ही समजतो तसा समजला का? शाळा तशी थोडाच वेळ असल्याने व बाहेर जाण्यावरही बंधने असल्याने एखादी कला शिकलात का? उदा. गाणे, चित्रकला, मेकॅनो, घरातले खेळ. जी मुले शाळेत जाऊ शकली नाहीत, ती या काळात काय शिकली? या विविध मुद्द्यांबाबत आपली मते विज्ञाननिबंधाद्वारे व्यक्त करावीत.

खुला गट (बारावीपुढचे) विषय : कोरोनाचे जाणवणारे दीर्घकालीन परिणाम

लोक घरात बसल्याने आरोग्याचे कोणते प्रश्न निर्माण झाले? वजन वाढले का? बाहेर जाताना सतत मुखपट्टी लावल्याने सर्दी-दमा-खोकला ह्याला आळा बसला का? कोरोना काळातील तीन नियम पाळल्यामुळे कोरोना दूर ठेवता आला का? कोरोना आणखी काही काळाने जाईल की तो मलेरियासारखा कायम टिकून राहील? कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद राहिल्याने त्याचे आर्थिक परिणाम काय घडून येत आहेत/येतील? शिक्षणावर त्याचे काय परिणाम झाले? मधल्या काळात शासनाने शिक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाने कोणते दूरगामी परिणाम होतील? कोरोनामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यातील कोणकोणत्या समस्या विज्ञान/तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडविता येतील? याबद्दलचे आपले विचार निबंधाद्वारे मांडावेत. (सूचना : छायाचित्रे, कात्रणे इत्यादींचा अंतर्भाव निबंधात करू नये.)

निबंध स्पर्धेसाठी नियम, अटी आणि कार्यपद्धती :

 1. निबंध पाठवण्यासाठीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून त्याचे पालन करावे.
 2. विद्यार्थी गट : बारावीपर्यंतचे विद्यार्थी.
 3. खुला गट : बारावीपुढचे विद्यार्थी आणि प्रौढ.
 4. एकाच गटात दोनदा पारितोषिक मिळाले आहे अशा व्यक्तीस पुन्हा पारितोषिक दिले जाणार नाही.
 5. निबंधांसाठी शब्दमर्यादा १५०० ते २००० अशी आहे. तसेच, कागद ए-४ आकाराचाच वापरावा.
 6. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन पूर्वनोंदणी करावी.
 7. पूर्वनोंदणी करण्यासाठीचा अर्ज www.mavipa.org/events/nibspa2021/ किंवा www.mavipa.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये योग्य प्राथमिक माहिती सादर करावी.
 8. हाती लिहिलेल्या निबंधाच्या प्रत्येक पानाचा फोटो अथवा स्कॅनिंग सुस्पष्ट आणि वाचनीय असेल ही काळजी स्पर्धकाने घ्यावी. कोणतेही लिखाण कापले जाणार नाही, उलटसुटल, आडवे-तिडवे, खूप लांबून फोटो अशा बाबी टाळाव्यात. लिखाण नीट वाचता येईल आणि फोटोमध्ये सावली येणार नाही, असेच फोटो घ्यावेत.
 9. निबंध JPG / PDF स्वरुपातच sucheta.vidnyan@mavipamumbai.org ह्या ई-मेलवर पाठवावा.
 10. स्पर्धकाने पहिल्या पानावर आपले पूर्ण नाव, पिनकोडसह पोस्टाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल लिहावा. निबंध पीडीएफ स्वरुपात पाठविल्यास पहिल्या पानाची पीडीएफ स्वतंत्र असावी. याचाच अर्थ, निबंधाची पीडीएफ आणि पहिल्या पानाची पीडीएफ वेगवेगळी असावी.
 11. निबंधाचे लिखाण सुटसुटीत व ठळक असावे अथवा ते संगणकीय टाईप केलेले असावेत, पृष्ठ क्रमांक सुस्पष्ट असावा. निबंधाच्या मध्ये कुठेही स्पर्धकाचे नाव आढळल्यास निबंध स्पर्धेतून बाद केला जाईल.
 12. स्पर्धेसंबंधी परिषदेचा निर्णय अंतिम राहील.
 13. दोन्ही गटांचे निबंध प्रथम भौगोलिक-विभाग पातळीवर तपासले जातील. भौगोलिक विभाग पुढीलप्रमाणे-
 • मुंबई व कोकण (जिल्हे- मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग)
 • दक्षिण महाराष्ट्र (जिल्हे- अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर)
 • उत्तर महाराष्ट्र (जिल्हे- नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार)
 • मराठवाडा (जिल्हे- औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हे)
 • विदर्भ (जिल्हे- बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली)
 • बृहन्महाराष्ट्र (महाराष्ट्राबाहेरचे सर्व स्पर्धक)
 1. मराठी विज्ञान परिषदेकडे निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक २० सप्टेंबर, २०२१.
 2. भौगोलिक-विभागस्तरावर निबंधांचे परीक्षण करून, त्यातून दोन्ही गटांतून – गुणानुक्रमे – प्रत्येकी दोन निबंध निवडले जातील.
 3. या निवडलेल्या निबंधांतून राज्यस्तरीय पातळीवर अंतिम परीक्षण करून प्रत्येक गटातून दोन निबंध निवडले जातील.
 4. स्पर्धेचा निकाल मराठी विज्ञान परिषदेच्या www.mavipa.org ह्या संकेतस्थळावर दि. १५ डिसेंबर, २०२१पर्यंत जाहीर केला जाईल.
 5. अंतिम परीक्षणानंतर दोन्ही गटांतील विभागीयविजेत्यांना प्रथम आणि द्वितीय अशी अनुक्रमे रु. ५००/- आणि रु. २५०/- ह्या रकमांची पारितोषिके दिली जातील.
 6. अंतिम विजेते पारितोषिके- विद्यार्थी गट- प्रथम क्रमांक रु. १,५००/- आणि द्वितीय क्रमांक रु. १,०००/- आणि खुला गट प्रथम क्रमांक रु. २,०००/- आणि द्वितीय क्रमांक रु. १,५००/-.
 7. विभागीय तसेच अंतिम प्रमाणपत्रे आणि पारितोषिके अनुक्रमे ई-मेल आणि इंटरनेट बँकिंग पद्धतीने पाठविली जातील, ह्याची नोंद घ्यावी.

पूर्वनोंदणी अर्ज

अधिक माहितीसाठी संपर्क :

मराठी विज्ञान परिषद,
विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०० ०२२.
दूरध्वनी : ०२२-२४०५ ४७१४, ०२२-२४०५ ७२६८
ई-मेल : office@mavipamumbai.org  संकेतस्थळ : www.mavipa.org

 

विज्ञाननिबंध स्पर्धा २०२१ पत्रक  Download