पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा

२०१९-२० या वर्षाचा निकाल

2019-20 निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा - पारितोषिके

प्रथमा, द्वितीया आणि तृतीया प्रत्येकी

  • प्रथम पारितोषिक रु. १,०००/-
  • द्वितीय पारितोषिक रु. ८००/-
  • तृतीय पारितोषिक रु. ६००/-

विस्तृत

मुलांनो, विज्ञानाचा वापर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या घरोघरो तर पोहोचलाच आहे. मोबाईल फोन-स्मार्ट फोन, लॅपटॉप, कॉम्प्यूटर, टॅब्लेट, 3डी गेम्स, स्मार्ट वॉच इत्यांदीचा वापर तर दैनंदिन जीवनात वाढतच आहे. आणखी 15-20 वर्षांनी यात बरीच भर पडेल व आत्ता विचारही करू शकत नाही असे विज्ञान-तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध असेल. अशा वेळी आपला विज्ञान विषय कच्चा असून चालणार आहे का तुम्हाला? विज्ञानाशी मैत्री न करून चालेल का? नाही ना! तर मग, तुम्हांला विज्ञानाशी मैत्री करायची आहे का? तीही मनोरंजक माहितीतून, प्रयोग करता-करता असेल तर काय मज्जा येईल ना? खरेच, शक्य आहे आणि सोप्पेही आहे. पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा हा उपक्रम मराठी विज्ञान परिषदेतर्फे गेली 20 वर्षे चालू आहे. या परीक्षा सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व प्रौढांसाठीही आहेत. तुम्ही संस्कृत, गणित, हिंदी, चित्रकलेच्या परीक्षा देता ना, अगदी तशाच. थोडाफार फरक तर यात असणारच ना! यात आपण काय करणार आहोत, याची कल्पना पुढे वाचल्यावर येईलच.

स्वरूप

विज्ञान परीक्षा सातवीसाठी प्रथमा, आठवीसाठी द्वितीया, नववीसाठी तृतीया व त्यापुढील मुलामुलींनाही, मग ते प्रौढ असले तरी चालतील, या सर्वांना या परीक्षेत सहभाग घेता येईल. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत आमच्याकडून 20 ते 40 पानांच्या छापील मजकुराची पुस्तिका आपल्याला पोस्टाने घरपोच मिळेल. यात सातवी व आठवीच्या मुलांना गणित, भौतिकी, रसायन, जैव, दैनंदिन जीवनातील विज्ञान, विज्ञान समस्या, विज्ञान गोष्टी, पुस्तक परीक्षण, घरच्याघरी करण्यायोग्य प्रयोग, छोटे प्रकल्प यांसारख्या विषयांचा यात समावेश असेल. हा मजकूर शाळेच्या पाठ्यपुस्तकातील नक्कीच नाही. पण सातवी, आठवी, नववीच्या मुलांना झेपेल असा, विज्ञानविषयी आवड वाढवणारा, थोडा आपल्या भारतीयांनी जुन्या काळात कोणते शोध लावले याची माहिती देणारा व अशा अनेक विषयांना छेडणारा अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम यात आहे.

पुस्तिकांबरोबर प्रश्नपत्रिका असणार आहेत. तुम्हांला मिळालेल्या पुस्तिकेतील तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यावर पुस्तिकांसोबत पाठवलेल्या उत्तरपत्रिकेत दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहून आम्हांला पाठवायची आहेत. पुस्तकांत पाहून उत्तरे लिहिलेली आम्हांला चालणार आहेत. म्हणजे कॉपी करण्याचा प्रश्नच उरणार नाही. या पुस्तिकांतील मजकुराचा अभ्यास तुम्ही केलात एवढे समाधान तुम्हांला व आम्हांला पुरे आहे. तुम्हांला करायला दिलेले प्रयोग करून पाहा. त्यांचे निष्कर्ष आम्हाला कळवा. येथे कोण पहिल्यांदा यशस्वी झाला आहे? अगदी नोबेल पारितोषिक विजेत्यांनीही चुका केल्या आहेत, मग आपला प्रयोग फसला हे कळवायला आपण घाबरायचे कशाला? तेही कळवा. तुम्ही केलेले हे प्रकल्प आम्हाला लिहून कळवायचे आहेत. प्रकल्प, प्रयोग आणि समस्यापूर्तींचा भाग तुम्हाला करावाच लागेल. तो भाग तर या परीक्षांचा प्राण आहे. तो सोडवला नाही तर तुम्ही नापास होणार.

 

तुम्ही सोडवलेल्या उत्तरपत्रिका आम्हाला ३० नोव्हेंबरपर्यंत पोस्टाने पाठवायच्या आहेत.

 

नियम

  • उत्तरपत्रिकेत तुम्हांला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला किती गुण मिळाले, तुम्ही कोठे चुकलात, या शेऱ्यांसह तुमच्या उत्तरपत्रिका तुम्हाला परत मिळतील.
  • सर्व उत्तरपत्रिका गुणपत्रकासह मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला मिळतील.
  • त्याचवेळी जे कमीतकमी 40 टक्के गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल.
  • शिवाय, महाराष्ट्रातील प्रत्येक इयत्तेच्या गुणानुक्रमे पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसे मिळतील.

या परीक्षांना मार्गदर्शनाचे वर्ग नाहीत की शिकवण्या. तुमचे तुम्हीच शिकायचे ही यातील खरी गंमत आहे. परीक्षांमुळे तुमचा व्यवहारातील चौकसपणा वाढणार आणि पुढील इयत्तेत जे विज्ञान शिकणार आहात, ते समजण्यास तुम्हाला सुलभ जाणार याची आम्हाला खात्री आहे. सर्व निर्णयांबद्दल मराठी विज्ञान परिषदेचे मत अंतिम राहील.

परीक्षा शुल्क

मराठी माध्यमासाठी परीक्षा शुल्क

प्रथमा (सातवी) – रु. 225/-,
द्वितीया (आठवी) – रु. 250/-
तृतीया (नववी) – रु. 275/-

 

इंग्रजी माध्यमासाठी परीक्षा शुल्क

Primary (7th) – Rs. 325/-,
Secondary (8th) – Rs. 375/-,
Final (9th) – Rs. 425/-,

परीक्षा शुल्क सोबतच्या नोंदणीअर्जा सोबत ऑनलाइन रक्कम भरावी. प्रौढांनी शाळेचे नाव वगळून आणि स्वतः प्रौढ असल्याचा स्वतंत्र उल्लेख जरूर करावा.

महत्त्वाचे

या परीक्षांना मार्गदर्शनाचे वर्ग नाहीत की शिकवण्या. तुमचे तुम्हीच शिकायचे ही यातील खरी गंमत आहे. परीक्षांमुळे तुमचा व्यवहारातील चौकसपणा वाढणार आणि पुढील इयत्तेत जे विज्ञान शिकणार आहात, ते समजण्यास तुम्हाला सुलभ जाणार याची आम्हाला खात्री आहे. सर्व निर्णयांबद्दल मराठी विज्ञान परिषदेचे मत अंतिम राहील.

नोंदणी अर्ज