वैद्यकीय पुस्तक पारितोषिक

वैद्यक विषयावरील मराठी पुस्तकाच्या लेखनाला दर तीन वर्षांतून एकदा खालील प्रमाणे तीन पारितोषिके देण्यात येतात.

डॉ. रा. वि. साठे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक

डॉ. टि. एच. तुळपुळे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक

डॉ. चंद्रकांत वागळे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक

ही तीन पारितोषिके अनुक्रमे १९९८, २००७, २०१० पासून तीन वेगवेगळ्या वैद्यकीय पुस्तकांना देण्यात येतात.
रु. ७,५००/- आणि सन्मानपत्र असे या प्रत्येक पारितोषिकाचे स्वरूप आहे. ऑगस्ट महिन्यात शेवटच्या रविवारी मराठी विज्ञान परिषदेत विज्ञान दर्पण हा कार्यक्रम संपन्न होतो, या कार्यक्रमात पारितोषिकाचे वितरण करण्यात येते.

तीनही वैद्यकीय पुस्तक पारितोषिकांसाठी नियम व अटी:

 • १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रकाशित झालेल्या वैद्यक विषयातील पुस्तकाच्या लेखकाला हे पारितोषिक देण्यात येईल.
 • ५० पेक्षा जास्त पृष्ठसंख्या असलेलेलीच पुस्तके परीक्षणासाठी विचारात घेतली जातील.
 • अनुवादीत आणि संपादीत पुस्तकांचा विचार परीक्षणासाठी केला जाणार नाही.
 • अर्ज केलेल्या प्रवेशिकांमधून एका प्रवेशिकेची निवड मराठी विज्ञान परिषदेने नेमलेल्या समितीमार्फत केली जाईल आणि त्या समितीचे निर्णय अंतिम राहतील.
 • ऑनलाईन प्रवेशअर्जाचा अंतिम दिनांक – २० जून २०२२
 • वरील सर्व वैद्यकीय पुस्तकांसाठी एकच ऑनलाईन प्रवेशअर्ज आहे. येथे उपलब्ध असलेल्या “नोंदणी अर्ज” यावर क्लिक करा. यामध्ये संपूर्ण माहिती भरावी.
 • प्रवेश- अर्ज भरून झाल्यावर लगेच लेखकाने पुस्तकाच्या तीन छापील प्रती मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यालयात खालील पत्यावर पाठवाव्यात. या पुस्तकांबरोबर एक स्पष्टीकणात्मक पत्र जोडावे.
  मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना.पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
 • पारितोषिक वितरण समारंभात पारितोषिक प्राप्त पुस्तकाच्या लेखकाने ८-१० मिनिटांत पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करणे आवश्यक आहे.
 • वरील नियम शिथिल करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे अधिकार मराठी विज्ञान परिषदेकडे राहतील.

गतवर्षीचे विजेते

गतवर्षीचे विजेते