विशिष्ट कार्यक्रम

विज्ञान दर्पण

विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात महनीय कार्य करणऱ्या व्यक्तींस मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रतिवर्षी सन्मान्य सभासदत्व अर्पण करण्यात येते आणि या सोहळ्याबरोबर अन्य एखाद्या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानांचा कार्यक्रम असतो.

वर्धापन दिन

परिषदेची स्थापना २४ एप्रिल १९६६ रोजी झाली आहे. त्यानुसार दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी विज्ञान भवनांत परिषदेचा वर्धापन दिन विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. या वेळी परिषदेतर्फे देणाऱ्या विविध पुरस्करांचे वितरण केले जाते.

अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

१९६६ सालापासून परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी विज्ञान अधिवेशन घेण्यात येते (पूर्वी यास संमेलन म्हटले जात असे). नामांकित मराठी भाषिक शास्त्रज्ञ या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून परिषदेतर्फे निवडले जातात. अधिवेशनाच्या अध्यक्षांचे भाषण हे या अधिवेशनांचे वैशिष्ट्य मानले गेले आहे. विविध विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्ती/संस्था यांचा अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात येतो; परिषदेतर्फे दिली जाणारी पारितोषिके तसेच पुरस्कार प्रदान केले जातात. व्यासपीठावरील दोन दिवसांच्या कार्यक्रमांत चर्चासत्रे, परिसवांद, व्याख्याने, कथा-कथन, शास्त्रज्ञांशी वार्तालाप, आदींचा समावेश असतो. अधिवेशनाला जोडून शैक्षणिक सहल आयोजित केली जाते. परिषदेचे विभाग असलेल्या ठिकाणी अधिवेशन आयोजित केले जाते.

राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन

मराठी विज्ञान परिषदेतर्फे पहिले बाल विज्ञान संमेलन २४,२५ व २६ डिसेंबर, १९९५ या कालावधीत मुंबईत संपन्न झाले. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील आठ विद्यार्थी याप्रमाणे एकूण २४० विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. पहिल्या संमेलनास फारच उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि मग पुढे दर तीन वर्षांनी ‘राज्यपातळीवर बाल विज्ञान संमेलन’ भरविण्यात येऊ लागले. आतापर्यंत, डिसेंबर १९९८- पाली (जि. रायगड), जानेवारी २००२- पन्हाळा (जि. कोल्हापूर), नोव्हेंबर २००४- औरंगाबाद, २००७- अमरावती, २०१०- वणी (जि. यवतमाळ), २०१३- जालना, २०१६- जळगाव आणि २०१९- मुंबई, अशी नऊ वेळा राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलने पार पडली.

मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी

विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानातील उच्चशिक्षणाच्या संधींविषयी माहिती मिळावी, उच्चशिक्षण देणार्‍या विविध शैक्षणिक संस्थेची माहिती मिळावी या उद्देशाने एप्रिल २०१४ पासून ‘मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी’ (Careers in Basic Sciences) या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विज्ञान परिषदेने केले आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र) आणि गणित या विषयांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. प्रत्येक विषयातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करतात. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळते.