परिषदेची स्थापना २४ एप्रिल १९६६ रोजी झाली आहे. त्यानुसार दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी विज्ञान भवनांत परिषदेचा वर्धापन दिन विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. या वेळी परिषदेतर्फे देणाऱ्या विविध पुरस्करांचे वितरण केले जाते.

५५वा वर्धापन दिन
दि. २५ एप्रिल, २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

कार्यक्रम

प्रमुख पाहुणे : डॉ. अरविंद रानडे – वरिष्ठ वैज्ञानिक, विज्ञान प्रसार, नवी दिल्ली

  • पुरस्कार प्रदान : श्री. सुधाकरराव उद्धवराव आठले विज्ञानप्रसारक पुरस्कार, मनोरमाबाई आपटे विज्ञानप्रसारक पुरस्कार, वसंतराव नाईक प्रतिष्ठान कृषि पुरस्कार, बळीराजा – अण्णासाहेब शिंदे कृषि पुरस्कार, ज्योती चापके पर्यावरणपूरक कृषि पुरस्कार
  • विज्ञान-पुस्तक पारितोषिक
  • ई-पुस्तक प्रकाशन

प्रमुख पाहुण्यांचे भाषण : विज्ञानाच्या दृष्टीतून – आत्मनिर्भर भारत

विज्ञानकथाकथन : श्रीमती स्मिता पोतनीस

विज्ञानकथावाचन : श्रीमती धनश्री करमरकर

कृपया पूर्वनोंदणी करावी ही विनंती.

नोंदणी

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण