सन्मान वैद्यकीय पुस्तक लेखकांचा आणि गौरव विद्यार्थ्यांचा मराठी विज्ञान परीषदेतर्फे वैद्यक विषयावरील मराठी पुस्तकाच्या लेखकांचा दर तीन वर्षांतून एकदा विज्ञान दर्पण या कार्यक्रमात डॉ. रा. वि. साठे, डॉ. टी. एच. तुळपुळे आणि डॉ. चंद्रकांत वागळे ही पारितोषिके देऊन सन्मान केला जातो. माध्यमिक शालांत परीक्षेत गणित विषयात सर्वाधिक गुण मिळवणार्‍या निवडक तीन शाळांमधील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा प्रा. श्रीधर नारायण गोडबोले पारितोषिक देऊन गौरव केला जातो. तसेच एखाद्या विषयावर व्याख्यानाचाही आयोजन करण्यात येते.

दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० ते १:०० या वेळात विज्ञान दर्पण हा कार्यक्रम संपन्न होईल.

पहिले सत्र

सकाळी १०:०० ते ११:१५  –  पारितोषिक वितरण

प्रा. श्रीधर नारायण गोडबोले पारितोषिक
विजय शिक्षण संस्थेचे प्रगती विद्यालय, (कर्णबधिरांसाठी) दादर –  कु. रवीकुमार सिंह,
महानगर पालिका शाळा तुर्भे – कु. अमिन मोहम्मदलिम शेख
काळबादेवी महानगर पालिका शाळा, चुनाभट्टी – कु. किशोरी नितीन कांबळे

डॉ. रा. वि. साठे पारितोषिक
‘शरीर’ लेखक – डॉ. अच्युत गोडबोले आणि डॉ. अमृता देशपांडे (मनोविकास प्रकाशन)

डॉ. टी. एच. तुळपुळे पारितोषिक
‘करोनाष्टक’ लेखक – डॉ. बाळ फोंडके (मॅजेस्टिक प्रकाशन)

डॉ. चंद्रकांत वागळे पारितोषिक
‘हेला’ पेशी  लेखिका – श्रीमती वंदना अत्रे आणि श्रीमती शोभना भिडे (राजहंस प्रकाशन)

सकाळी ११:१५  ते १ :००  – व्याख्याने

डॉ. रंजन केळकर – भारतील हवामान बदल

डॉ. कृष्णानंद होसाळीकर – महाराष्ट्रातील हवामान बदल

 

कार्यक्रम स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४००२२

तसेच कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा केले जाईल.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण