विशेष दिन

मराठी भाषा गौरव दिन – २७ फेब्रुवारी

ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर ह्यांचा जन्मदिवस, दि. २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन, म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे आणि विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे;

राष्ट्रीय विज्ञान दिन – २८ फेब्रुवारी

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यापैकी, देशात विज्ञानमयी वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे, ही एक योजना होती.

जागतिक महिला दिन – ८ मार्च

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव पास झाला.

राष्ट्रीय गणित दिन - २२ डिसेंबर

कोणासाठी ? : शालेय विद्यार्थ्यांसाठी / शिक्षकांसाठी / सर्वांसाठी

श्रीनिवास रामानुजन हे प्रख्यात भारतीय गणितज्ज्ञ. गणित क्षेत्रात श्रीनिवास रामानुजन ह्यांनी अलौकिक कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून २२ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी विज्ञान परिषदेत २०१३पासून राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यास सुरवात झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिषदेतर्फे गणित विषयावर विविध स्पर्धा, मेळावे आणि कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते.