मराठी भाषा गौरव दिन – २७ फेब्रुवारी

 

ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर ह्यांचा जन्मदिवस, दि. २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन, म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे आणि विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे;  हे मराठी विज्ञान परिषदेच्या चार उद्देशांपैकी पहिले दोन! विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मातृभाषेइतके दुसरे प्रभावी माध्यम नाही आणि म्हणून ह्या दोन उद्देशांमधील कामासाठी मविपला मराठी भाषा संवर्धन पुरस्कारही महाराष्ट्र राज्य शासनाकडून मिळाला आहे.

येत्या शनिवारी, २७ फेब्रुवारीला संपर्कस्थापन माध्यमाद्वारे मविपचे ज्येष्ठ कार्यवाह अपां अर्थात श्री. अनंत पांडुरंग देशपांडे ह्यांचे जागतिक आणि विशेषतः मराठीतील साहित्य, तसेच विज्ञानाशी निगडीत महनीय व्यक्तिंचे बहारदार किस्से यावर सकाळी ११:०० ते १२:०० या कालावधीत भाषण आहे. मराठी आणि विज्ञानप्रेमी हे भाषण मविप संकेतस्थळावर आणि मविपच्या फेसबुक-खात्यावर थेट प्रक्षेपणाद्वारे कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील.

 

कार्यक्रम व्हिडिओ