राष्ट्रीय गणित दिन – २२ डिसेंबर

श्रीनिवास रामानुजन हे प्रख्यात भारतीय गणितज्ज्ञ. गणित क्षेत्रात श्रीनिवास रामानुजन ह्यांनी अलौकिक कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून २२ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी विज्ञान परिषदेत २०१३पासून राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिषदेतर्फे गणित विषयावर विविध स्पर्धा, मेळावे आणि कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते.

राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कार्यक्रम घेतला जातो.

विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम (इयत्ता ५ वी ते ९ वीचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात) :

स्पर्धा : या कार्यक्रमांतर्गत समस्यापूर्ती आणि गणितातील कोडी सोडवा अशा स्वरुपाच्या स्पर्धांमधून कृतीशीलतेवर भर दिला जातो. विद्यार्थी यातून समस्या आणि कोड्यांची उत्तरे शोधतात.

गणित मेळावा : यामध्ये गणित विषयातील काही प्रारूपांची मांडणी केलेली असते. या प्रारूपांवरून विद्यार्थी गणितातील संकल्पना समजावून घेतात.

गणित-शिक्षकांसाठी कार्यशाळा (इयत्ता ५वी ते ९वीचे गणित शिक्षक यात सहभागी होऊ शकतात) :

गणित विषय शिकवताना शिक्षकांना काही समस्या असतात, त्या कशा सोडविता येतील याचे मार्गदर्शन या कार्यशाळांमधून करण्यात येते.

स्पर्धा, गणित मेळावा किंवा शिक्षक-कार्यशाळा हे कार्यक्रम मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून घेतले जातात.

कार्यक्रमाचा उद्देश :

  • गणित या विषयाची विद्यार्थांच्या मनात बऱ्याच वेळा भीती असते; ही भीती कमी करणे.
  • विद्यार्थांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण करणे.
  • समस्यापूर्ती आणि कोडी सोडवा, अशा स्वरुपाच्या स्पर्धांमुळे विद्यार्थांना त्या समस्येचा / कोड्यांचा विविध बाजूने विचार करण्याची सवय लागते.