राष्ट्रीय विज्ञान दिन – २८ फेब्रुवारी

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यापैकी, देशात विज्ञानमयी वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे, ही एक योजना होती. यानिमित्ताने, लोकांना नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या संशोधनाचे स्मरण व्हावे, विज्ञानाचे महत्त्व त्यांना समजावे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

 

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात साधारण पंधरा दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असतात. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने यावर्षीशिक्षण, कौशल्ये आणि कृती यांवर  विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तनाच्या अनुषंगाने साधावयाचा परिणाम ही संकल्पना जाहिर केली आहे. (This year’s theme for the National Science Day (NSD) 2021 is “Future of STI: Impacts on Education, Skills and Work”) कोविड-१९ महामारीमुळे मराठी विज्ञान परिषदेने प्रथमच ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’निमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर आणि फेसबुकवर केले जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.

कार्यक्रम व्हिडिओ