राष्ट्रीय विज्ञान दिन – २८ फेब्रुवारी

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यापैकी, देशात विज्ञानमयी वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे, ही एक योजना होती. यानिमित्ताने, लोकांना नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या संशोधनाचे स्मरण व्हावे, विज्ञानाचे महत्त्व त्यांना समजावे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात साधारण पंधरा दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असतात.

मराठी विज्ञान परिषदेने या वर्षीही ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ निमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्पर्धापरीक्षांत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी- शाळांनी नाव नोंदवावे व भाग घ्यावा, (प्रवेश निशुल्क).

इतर कार्यक्रमही सर्वांसाठी खुले व विनामूल्य असून सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.

२०२२ वर्षासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रम

अ) स्पर्धा 

१) वक्तृत्व स्पर्धा – विषय:  किस्से शास्त्रज्ञांचे

 • वयोगट  – इयत्ता ७ वी ते ९ वीचे विद्यार्थी
 • या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही एका शास्त्रज्ञाच्या जीवनातील किस्सा ५ ते १० मिनिटात सांगून त्याची चित्रफीत तयार करून परिषदेकडे पाठविणे अपेक्षित आहे.
 • विद्यार्थ्यांनी चित्रिकरण केलेला व्हिडिओ त्यांच्या गुगल ड्राईव्हवर अपलोड करावा व तो अपलोड केलेल्या व्हिडिओ office@mavipa.org या इ मेल पत्त्यावर पाठवावा किंवा शेअर  करावा.
 • परिषदेकडे चित्रफीत पाठविण्याचा अंतिम दिनांक : २२ फेब्रुवारी २०२२
 • चित्रफीत पाठवताना स्पर्धकाने स्वत:चे नाव, पत्ता,  फोन (मोबाईल) क्रमांक , शाळेचा पूर्ण पत्ता  द्यावा.
 • चित्रफीतींचे परीक्षण करून त्यातून दोन क्रमांक काढले जातील.
 • पारितोषिके: १) प्रथम क्र. रु. ५००/-  व  २) द्वितीय क्र. रु. ३००/-

 

२) प्रयोग सादरीकरण स्पर्धा –  विषय : माझे दप्तर-माझी प्रयोगशाळा

 • वयोगट –  इयत्ता ७ वी ते ९ वीचे विद्यार्थी
 • नोंदणी करण्यासाठी इमेल आयडी :  office@mavipa.org स्पर्धकाने स्वत:चे नाव, पत्ता, फोन (मोबाईल) क्रमांक, शाळेचा पूर्ण पत्ता  द्यावा.
 • नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२२
 • सादरीकरण दिनांक : १७ फेब्रुवारी २०२२ (संपर्कस्थापन प्रणाली)
 • या स्पर्धेसाठी विद्यार्थी दप्तरातील साहित्यातून  (उदा, वही, पुस्तक, कंपासपेटीतील साहित्य, रंगखडू, कातरी, इत्यादी) एखादा ५ मिनिटांचा प्रयोग दाखवतील व त्याची कारणामिमांसा सांगतील. परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतील. (संपर्कस्थापन प्रणालीद्वारे परीक्षण करण्यात  येईल. विद्यार्थ्यांना त्यांची वेळ नेमून दिली जाईल)
 • सहभागी विद्यार्थीसंख्येनुसार दोन किंवा तीन क्रमांक काढले जातील.
 • पारितोषिके: १) प्रथम क्र. रु. ५००/-  व  २) द्वितीय क्र. रु. ३००/-

 

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून योजिलेले खालील कार्यक्रम मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येतील. लवकरच या कार्यक्रमांची अधिकची माहिती संकेतस्थळावर  देण्यात  येईल.

ब) विद्यार्थ्यांसाठी प्रयोग कार्यक्रम

 • वयोगट : शालेय विद्यार्थी- ६वी – ७वी
 • दिनांक २४ फेब्रुवारी रोजी संध्या. ३ ते ४
 • श्रीमती अनघा वक्टे या ‘घनता आणि दाब’ या विषयावर आधारीत मनोरंजक प्रयोग दाखवतील.

 

क) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम

१.  विज्ञान कथाकथन   अधिक माहिती

२. संशोधनातील ताज्या घडामोडी – जीवशास्त्र

३. संशोधनातील ताज्या घडामोडी – रसायनविज्ञान  

४. संशोधनातील ताज्या घडामोडी – भौतिकशास्त्र

 

ड) राष्ट्रीय विज्ञान दिन:  समारोप कार्यक्रम – दिनांक २७ फेब्रुवारी

वेळ: दुपारी ३ ते संध्या.५ वा. – स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

नेहरू विज्ञान केंद्राचे संग्रहालय अभिरक्षक ‘जी’ आणि शिक्षण विभागाचे प्रमुख (Curator ‘G’ & Head, Education) श्री. उमेश कुमार रुस्तगी व्याख्यान देणार आहेत.

याचवेळी मराठी विज्ञान परिषदेने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना तसेच वेध २०३५ परिक्षेतील विजेत्यांना श्री. उमेश कुमार रुस्तगी यांच्या हस्ते पारितोषिके दिली जातील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण परिषदेच्या युट्यूब चॅनेलवरून पहावयास  मिळेल.

https://youtube.com/mavipa/live