जागतिक महिला दिन – मार्च

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा ` आंतरराष्ट्रीय महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत महिलांना मदतानाचा हक्क मिळाला.

पुढे १९७५ हे वर्ष युनोने `आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. महिलांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा महिला संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता जगभर सर्वत्र ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी लैंगिक समानता’ (Gender equality today for a sustainable tomorrow) ही या वर्षीची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

मराठी विज्ञान परिषदेने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने बुधवार, दि. ९ मार्च २०२२ रोजी फूड मिनिएचर अर्थात खाद्यपदार्थ लघुप्रतिकृती या विषयावर दुपारी ४ ते ५ या वेळेत श्रीमती सायली समेळ यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानात प्रतिकृतीसाठी वापरण्यात येणारी माती आणि रंगांचे गुणधर्म, मातीला टणकपणा येण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया, हे सर्व करताना आलेले अनुभव आणि छंदातून उद्योग निर्मिती कशी झाली, इत्यादी मुद्दे आणि प्रश्नोत्तरे असतील. हे व्याख्यान ऑनलाईन होईल आणि त्याचवेळी यूट्युबवरून त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ जरूर घ्यावा. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया नाव नोंदणी करावी.

नाव नोंदणी