विज्ञान खेळणी

आपल्या घरी, आजूबाजूला सहज सापडू शकेल अशा साहित्यातून मुले मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार व प्रात्यक्षिकानुसार विज्ञान खेळणी बनवतात. खेळणी बनवून त्याच्याशी खेळतात. खेळणे बनवताना व खेळताना वैज्ञानिक तत्वे, नियम शोधतात.

  • वी ते १०वीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसर आणि विषयांनुसार  कार्यक्रम  कालावधी तास ते १० तास असा घेतला जातो.
  • ध्वनी, प्रकाश, दृष्टी, घर्षण, दाब, ऊर्जा रूपांतरण, गुरुत्वमध्य, भौमितिक आकृत्या, विद्युत-चुंबक, गती इ. विषयावर खेळणी आधारीत असतात.

पुढील क्षमता विद्यार्थ्यांमध्ये  विकसित व्हाव्यात या  उद्देशांनी हा कार्यक्रम आखला आहे. 

  • सहज मिळणार्‍या वस्तुंपासून खेळणी तयार करणे,
  • पदार्थांचे गुणधर्म लक्षात घेऊन त्यातील योग्य पर्याय निवडणे,
  • अपेक्षित परिणाम साधण्यासाठी साहित्यांची योग्य मांडणी करणे,
  • नवीन खेळणी बनवणे, त्याचा आनंद घेणे,

त्यामागील वैज्ञानिक तत्त्व शोधणे, ते समजून घेणे आणि दैनंदिन घटनांशी त्याचा संबंध लावणे.