
वेध २०३५ - वेध प्रगतीचा
भविष्यातला वैज्ञानिक बनवूया सोप्या भाषेत विज्ञान शिकूया
उत्सुक विद्यार्थी
भविष्यातील स्पर्धा-परीक्षांची मूलभूत तयारी आणि त्यांचे तंत्र समजून घेण्यासाठी ही परीक्षा विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी आहे.

National Science Olympiad

National Medicine Olympiad

National Engineering Olympiad

IIT-JEE
वेध २०३५ विज्ञान परीक्षा द्या अगदी 3 सोप्या स्टेप्स मध्ये
लगेचच नोंदणी कराविज्ञानविषयक माहितीला सुरुवात
वेध २०३५ विज्ञान परीक्षेतून विद्यार्थ्यांना काय मिळेल
-
विविध बक्षिसे
प्रथम येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून वैज्ञानिक साहित्य जसे की दुर्बीण, द्विनेत्री, सूक्ष्मदर्शी इ. देण्यात येणार आहे.
-
सहभाग प्रमाणपत्र
सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगति दाखवायल मदत करू शकते.
-
अप्रतिम अभ्यासक्रम सामग्री
सर्वात उत्कृष्ठ अशी अभ्यासक्रम सामग्री पुरवली जाणार आहे, जी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची तयारी करण्यास मदत करू शकते.
-
नाविन्यपूर्ण पद्धतींनी शिक्षण
अभ्यासक्रम व सामग्री ही प्रख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदशनाखाली तयार केलेली आहे .
-
शालेय परीक्षांची पूर्वतयारी
अगदी सोप्या आणि मजेशीर स्वरूपात शालेय परीक्षांची तयारी ह्या परीक्षेतून होईल.
-
संकल्पनात्मक शिक्षणपद्धती
संकल्पनात्मक शिक्षणपद्धतीमुळे त्या विषयाची सखोल माहिती मुलांना अगदी सोप्या मार्गाने होते.
परीक्षेबद्दलची पाल्य आणि पालकांची मते
मागील वर्षाचे विजेते व निकाल
प्रथमा ६वी-७वी

Laksh Chetan Limaye

Neel Chetan Mahajan

Inesh Ashutosh Pailwan
द्वितिया ८वी- ९वी


Shubham Satish Deshmukh

Harsh Ashish Rao
त्यासाठी लवकरात लवकर परीक्षेचा अर्ज भरा
परीक्षेचे स्वरूप व पारितोषिके
प्रथमा परीक्षा- लहान गटासाठी - इयत्ता ६वी-७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
द्वितीया परीक्षा- मोठ्या गटासाठी - इयत्ता ८वी-९वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ते प्रथमा परीक्षासुद्धा देऊ शकतात; त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.
एकूण ८ आठवड्यांच्या कालावधीत, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना – दोन आठवड्यांचा एक टप्पा याप्रमाणे – चार टप्प्यात अभ्यास-सामग्री संकेतस्थळावर दिली जाणार आहे.
विषयवार पीडीएफ् स्वरुपातील मजकूर, काही व्हिडिओ व्याख्याने, व्हिडिओ प्रयोग, काही कोडी, काही विज्ञान-खेळ अशा प्रकारची ही अभ्यास-सामग्री असणार आहे.
परीक्षेचे स्वरूप व पारितोषिके

दुर्बीण

द्विनेत्री

सूक्ष्मदर्शक

मोठा प्रयोग-संच

मध्यम प्रयोग-संच
वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षेचा अभ्यासक्रम आणि व्याप्ती
परीक्षेचे विषय प्रथम व द्वितीया साठी | प्रथमा (इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी) | द्वितीया (इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी) |
---|---|---|
भौतिकशास्त्र | गती, बल व यंत्रे, ऊर्जा, ध्वनी, उष्णता, विद्युत, चुंबक, प्रकाश. | गती व बल, कार्य व ऊर्जा, विद्युतधारा व विद्युतधारेचे परिणाम, ध्वनी, प्रकाश. |
रसायनशास्त्र | मूलद्रव्ये, मिश्रणे व संयुगे, धातू आणि अधातू, रासायनिक व भौतिक बदल, आम्ल व आम्लारी, नैसर्गिक साधनसंपत्ती : हवा, पाणी व जमीन | अणू संरचना, रासायनिक अभिक्रिया, कार्बन आणि कार्बनी संयुगे, हरित रसायनशास्त्र |
वनस्पतीशास्त्र | वनस्पतींमधील विविधता व अनुकूलन, वनस्पतींचे विविध भाग आणि त्यांची कार्ये, वनस्पतींमधील वाढ, हालचाल व प्रतिसा, वनस्पतींमधील पोषण. | वनस्पतींमधील वेगवेगळ्या जीवनप्रक्रिया, वनस्पतीशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान |
प्राणीशास्त्र | प्राणीसृष्टीतील विविधता व अनुकूलन, सूक्ष्मजीव, प्राण्यांमधील वाढ, हालचाल व प्रतिसाद, आहार आणि पोषण. | मानवी पचनसंस्था, चेतासंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, उत्सर्जनसंस्था |
खगोलविज्ञान | आपली सूर्यमाला, तारकासमूह, उल्का, अशनी आणि धुमकेतू | तारे आणि त्यांचा जीवनक्रम, अवकाशाचा वेध, अवकाशसफरी |
वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षेची गुणांकन पद्धती
अनु. क्र. | प्रश्नाचा प्रकार | प्रश्नाचे स्वरूप | परीक्षा | प्रश्न संख्या | वेळ (मिनिटे) | प्रत्येकी गुण | एकूण गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | बहुपर्यायी प्रश्न | ठराविक वेळेत दिलेले बहुपर्यायी प्रश्न सोडविणे. | खंड १ – ७५ मिनिटे ४० गुण | ४० | ७५ | ०१ | ४० |
२ | चित्रावरून बहुपर्यायी प्रश्न | प्रत्येक चित्र दाखवले जाईल आणि त्यावर एकेक बहुपर्यायी प्रश्न विचारला जाईल. एकूण १० चित्रे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र आणि खगोलविज्ञान या विषयांवर आधारित प्रत्येकी दोन चित्रे असतील. | खंड २ – ७५ मिनिटे ५० गुण | १० | २५ | ०२ | २० |
३ | व्हिडियोवरून प्रश्न | तीन ते चार मिनिटांचा व्हिडियो दाखवला जाईल. प्रत्येक व्हिडियो नंतर दोन बहुपर्यायी प्रश्न दाखवले जातील. असे पाच व्हिडियो असतील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र आणि खगोलविज्ञान या विषयांवर आधारित प्रत्येकी एक व्हिडियो असेल. | खंड २ – ७५ मिनिटे ५० गुण | १० | २५ | ०२ | २० |
४ | क्रम लावा | एखादा घटनाक्रम / प्रयोग / प्रक्रिया वेगवेगळ्या १० टप्प्यांमध्ये दिली असेल. त्याचा योग्य क्रम लावणे. | — | ०१ | १० | १० | १० |
५ | अभ्यासक्रम चाचणीचे गुण | अभ्यास सामग्री बरोबर देण्यात आलेले क्विझ सोडवून मिळालेल्या गुणांपैकी २५ टक्के गुण | चाचणी १० गुण | — | — | — | १० |
एकूण गुण: १०० |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- तुमचा पासवर्ड विसरलात? ते हरवले? किंवा फक्त तुमच्या गरजेनुसार बदलू इच्छित असल्यास, लॉगिन पृष्ठावर ‘Forgot Password’ पर्यायावर क्लिक करा- https://learn.mavipa.org/.
- तुम्हाला पासवर्ड रीसेट पृष्ठावर (https://learn.mavipa.org/wp-login.php?action=lostpassword) नेले जाईल जिथे तुम्हाला तुमचे युसरनेम सबमिट करणे आवश्यक आहे.
- एकदा सबमिट केल्यावर, तुम्हाला मविप कडून एक ईमेल प्राप्त होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड रीसेट करण्यासाठी लिंक दिली जाईल.
- त्या लिंकवर क्लिक करा आणि नवीन पासवर्ड सबमिट करा.
- तुम्ही चुकून परीक्षेचे चुकीचे माध्यम किंवा वर्ग निवडले आहे का? काळजी करू नका.
- कोर्से पोर्टल साठी तुमच्यासोबत ईमेलवर शेअर केलेले युजरनेम आणि पासवर्ड सबमिट करून लॉगइन करा- https://learn.mavipa.org/.
- यशस्वी लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला फक्त एकदाच एक स्क्रीन दिसेल ज्यावर तुम्ही भाषा आणि वर्ग निवडू शकता.
- एकदा सबमिट केल्यानंतर माहिती बदलता येत नाही.
अभ्यास सामग्री विकसन मंडळ
श्री. हेमंत लागवणकर, श्री. आनंद घैसास, श्री. विक्रांत घाणेकर, डॉ. तनुजा परुळेकर, श्रीम. सुनित धारणे, श्रीम. प्रिया लागवणकर, श्रीम. चारुशीला जुईकर, श्रीम. शुभदा वक्टे, श्रीम. अनघा वक्टे, श्रीम. सुचेता भिडे, आणि डॉ. जयंत जोशी