विज्ञानविविधा

जानेवारी ०१

उद्देश- विज्ञान प्रसार करणे आणि विज्ञानाची आवड निर्माण करणे
कोणासाठी- शालेय विद्यार्थी
कार्यक्रम अवधी- दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी दुपारी १ तास (वेळ ४ ते ५)
कार्यक्रम माध्यम- मराठी
संकल्पना- गोष्ट सर्वांनाच आवडते, त्यातून शिकवणही मिळते. पण गोष्टीकडे विविध अंगांनी कसे पाहायचे, बारकावे कसे शोधायचे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा विचार करायचा; ही सवय मुलांना लागावी, यासाठी विज्ञान विविधा हा उपक्रम घेतला जातो.
गोष्ट – साधी-सोपी, असली तरीही त्यात अनेक प्रकारची माहिती शोधली जाऊ शकते. अनेक वेगवेगळ्या बाबींचा विचार एखादा जिज्ञासू विद्यार्थी करायला लागतो; आणि ती सवय लागली तर!
गोष्ट, प्रयोग, चित्रफिती, मनोरंजक माहिती, कोडी यातून मुले गंमत-जंमत करत हा कार्यक्रम अनुभवतील आणि त्यातील काही भाग घरीही करून पाहतील, यात शंका नाही.
या कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
गोष्ट १. गोष्टीतले विज्ञान,
२. गोष्टीतील विज्ञान संकल्पनेवर आधारीत प्रयोग , खेळणे
३. शास्त्रज्ञाची माहिती,
४. निसर्गातील एखाद्या घटकाची माहिती,
५. विज्ञान कोडी
मुलांच्या विचारांना नवी दिशा देणारा, नवे आयाम देणारा हा कार्यक्रम मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही नक्कीच आवडेल.

Share the post    
Share

Sorry. This form is no longer available.