• कार्यक्रम
  • ऑनलाईन कार्यशाळा इ. ६वीच्या विद्यार्थ्यांसाठी

ऑनलाईन कार्यशाळा इ. ६वीच्या विद्यार्थ्यांसाठी

जानेवारी ०१

मराठी विज्ञान परिषदेने इयत्ता ६वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ‘बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा’ आयोजित केली आहे (मराठी आणि इंग्रजी माध्यम). ही कार्यशाळा दरदिवशी अडीच तास याप्रमाणे २ दिवस असेल. यामध्ये विद्यार्थ्यांस व्हिडिओच्या माध्यमातून ३५ प्रयोगांचे स्पष्टीकरण, निरीक्षणे आणि अपेक्षित उत्तरे यांविषयी मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांना प्रयोगांविषयीची कृती पुस्तिका नाव नोंदणी झाल्यानंतर ई-मेलने मिळेल.
इच्छुक असल्यास इ. ६वीच्या कार्यशाळेसाठी इ. ५वी आणि ७वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

१. कार्यशाळेचे दिनांक: २७ आणि २८ जाने २०२२
२. कालावधी: सायं. ४ ते ६:३० – एकूण २ तास ३० मिनिटे
३. शुल्क: दोन दिवसांसाठी रु. ५००/-
४. प्रयोगांची संख्या: पहिल्या दिवशी १७ प्रयोग (प्रयोग करताना घ्यावयाची दक्षता-५ प्रयोग, रसायनशास्त्र-६ प्रयोग, सामान्य विज्ञान-६), तर दुसर्‍या दिवशी १८ प्रयोग (भौतिकशास्त्र-६, वनस्पतीशास्त्र-६, प्राणीशास्त्र-६) असे मार्गदर्शन केले जाईल.
५. विषय: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र

Share the post    
Share