परिषदेचे विश्वस्त मंडळ : 

१) डॉ. अनिल काकोडकर
२) श्री. प्रभाकर देवधर
३) डॉ. विजय केळकर
४) श्री. प्रमोद लेले
५) डॉ. वसुधा कामत
६) प्रा. सुहास पेडणेकर
७) डॉ. अश्विनी भालेराव-गांधी

प्रा. ज्येष्ठराज जोशी (माजी संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) हे परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.


परिषदेच्या कार्यकारिणीवरील सदस्यांची संख्या एकूण २८ असून, त्यांत चार उपाध्यक्ष, तीन कार्यवाह आणि एक कोषाध्यक्ष यांचा अंतर्भाव आहे. याखेरीज परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व विभागांचा एक-एक प्रतिनिधी कार्यकारिणी सदस्य असतो.

कार्यकारिणीची सभा ही वर्षातून दोनदा घेतली जाते. कामकाजाच्या सोयीकरीता परिषदेचे पदाधिकारी आणि मुंबईत स्थायिक असलेले कार्यकारिणी सदस्य यांची स्थायी समिती नेमण्यात आली आहे. स्थायी समितीची सभा दरमहा एकदा घेतली जाते.

परिषदेचे दैनंदिन काम पाहण्यासाठी १५ पूर्णवेळ कर्मचारी आहेत. परिषदेच्या कामाची आखणी कार्यकारिणी करत असते. सर्व कार्यकारिणी सदस्य स्वयंसेवी वृत्तीने या कामात सहभागी असतात.

परिषदेची वार्षिक उलाढाल सुमारे एक कोटी रुपयांची आहे. विविध स्वरूपाच्या वैयक्तिक तसेच संस्थांद्वारे मिळणार्‍या देणग्या, प्रायोजकत्व, कार्यक्रमांतून मिळणारे शुल्क, सभासद वर्गणी, पत्रिकेकरीता मिळणार्‍या जाहिराती, इत्यादी, परिषदेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत.


उद्देश | व्यवस्थापन | माजी अध्यक्ष | अधिवेशनांचे अध्यक्ष | सन्मान्य सभासद | मिळालेले पुरस्कार | परिषदेची घटना आणि नियम  | वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल