राष्ट्रीय विज्ञान दिन : २८ फेब्रुवारी

परिषदेतर्फे दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमात विविध व्याख्याने, स्पर्धा, चर्चासत्रे, प्रदर्शने, इत्यादींचा समावेश असतो. मध्यवर्ती संस्थेबरोबर परिषदेचे बहुतांश विभागही यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात.


जागतिक महिला दिन  : ८ मार्च

दर वर्षी ८ मार्च रोजी परिषदेतर्फे जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी परिषदेत, महिलांशी संबंधित एखादा विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो.


रसायनशास्त्र दिन :

सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्लचंद्र राय यांचा जन्मदिवस २ ऑगस्ट रोजी येतो. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ  २००८ सालापासून दरवर्षी ऑगस्ट महिन्यात, परिषद रसायनशास्त्र दिन साजरा करते. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रातील प्रयोग करायला देऊन, त्यातील संकल्पना समजावून दिल्या जातात.


राष्ट्रीय गणित दिन : २२ डिसेंबर

सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने परिषदेतही गणितविषयक व्याख्याने, विविध स्पर्धा, इत्यादी, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.