मनोरमाबाई आपटे विज्ञान प्रसार पुरस्कार

 कोणासाठी? : प्रौढांसाठी

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्ष १९९३ पासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार तीन वर्षांतून एकदा दिला जातो.

अधिक माहिती 


वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार / बळीराजा अण्णासाहेब शिंदे पुरस्कार

कोणासाठी? : प्रौढांसाठी

कृषिक्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त कामगिरी करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी, वर्ष १९९५ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार तीन वर्षांतून एकदा दिला जातो.

अधिक माहिती


विज्ञान संशोधन पुरस्कार

कोणासाठी? : महाविद्यालयीन विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे याकरिता प्रोत्साहन म्हणून पुरस्कारांची ही योजना वर्ष २००१-०२ पासून अंमलात आणली जात आहे. ‘परशुराम बाजी आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार’, ‘लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार’ आणि ‘शरद नाईक विज्ञान संशोधन पुरस्कार’ असे तीन पुरस्कार दरवर्षी दिले जातात.

२०२३ च्या पुरस्कार विजेत्यांची यादी 

यापूर्वीच्या विजेत्यांची एकत्रित यादी 


सु. त्रिं. तासकर परिवार पुरस्कार

कोणासाठी? : प्रौढांसाठी

अधिक माहिती 


प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान संशोधन पुरस्कार

महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर संशोधन करणाऱ्या प्रत्येकी एका अध्यापकास, त्याच्या सर्वांगीण संशोधन कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. २०१४ सालापासून दिला जाणाऱ्या या पुरस्काराची वयोमर्यादा कमाल पन्नास वर्षे ही आहे.

अधिक माहिती


भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार

कोणासाठी? : अभियंता संशोधक

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी, अभियांत्रिकी क्षेत्रात व्यावहारिक उपयुक्तता असणाऱ्या उत्कृष्ट संशोधनासाठी, चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या अभियंत्यास हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी अभियांत्रिकीचे क्षेत्र दरवर्षी वेगवेगळे असते.

अधिक माहिती


श्री. सुधाकर उद्धवराव आठले विज्ञान प्रसार पुरस्कार

कोणासाठी? : प्रौढांसाठी

समाजात वेगवेगळ्या प्रकारे विज्ञान प्रसाराचे कार्य करणाऱ्या, साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला, हा पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी दिला जातो.


सौ. ज्योती चापके कृषी पुरस्कार

पर्यावरणस्नेही शेती करणाऱ्यास व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी, २०२० सालापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार तीन वर्षांतून एकदा दिला जातो.