विज्ञान खेळणी  : शालेय विद्यार्थ्यांसाठी

हा उपक्रम १९९६ सालापासून सुरू झाला. आपल्या घरी, आजूबाजूला सहज सापडू शकेल अशा साहित्यातून मुले मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार व प्रात्यक्षिकानुसार विज्ञान खेळणी बनवतात. खेळणी बनवून त्याच्याशी खेळतात. खेळणे बनवताना व खेळताना वैज्ञानिक तत्वे, नियम शोधतात…


बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा  : विद्यार्थ्यांसाठी

होमी भाभा स्पर्धा-परीक्षेच्या तयारीसाठी, ही कार्यशाळा २००० सालापासून घेण्यात येते. या उपक्रमाद्वारे इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालवैज्ञानिक प्रयोग’ कार्यशाळा आयोजित केली जाते. ही कार्यशाळा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या विद्यर्थ्यांसाठी घेतली जाते.


मनोरंजक विज्ञान  : सर्वांसाठी

मनोरंजक विज्ञान (Joy with Science) हा विज्ञान प्रयोगांचा कृतीशील उपक्रम एप्रिल २०१६पासून सुरू झाला. हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा कार्यक्रम घेतला जातो.


शहरी शेती ओळखवर्ग : सर्वांसाठी

घरात निर्माण होणाऱ्या जैविकदृष्ट्या विघटनशील  कचऱ्याचा वापर करुन गच्चीत वा बाल्कनीत भाज्या व फळे यांचे उत्पादन घ्यायचे तंत्र ‘शहरी शेती’ म्हणून ओळखले जाते. हे तंत्र  वापरून एक बगिचा मविपच्या गच्चीवर १९९४ साली उभारला. या तंत्राची ओळख करुन देणारे वर्ग परिषद तेव्हापासून दरमहा घेत आहे. याद्वारे घनकचरा व्यवस्थापनाचा उत्पादक मार्ग आमजनतेपर्यंत  पोहोचवण्याचे काम  परिषद गेली जवळपास तीस वर्षे करत आहे.

(पुढे वाचा >> )