विज्ञाननिबंध स्पर्धा

कोणासाठी? : सर्वांसाठी

वर्ष १९६७पासून दरवर्षी घेतल्या जाणार्‍या या स्पर्धेत, स्पर्धकांकडून वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहून घेतले जातात. या स्पर्धेची विद्यार्थी गट (इयत्ता बारावीपर्यंत) आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करून विभागीय विजेत्यांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जातात. वर्ष २०१६पर्यंत या स्पर्धेची पारितोषिके प्रा. चिं. श्री. कर्वे यांच्या नावे देण्यात येत होती. दोन्ही गटांत प्रत्येकी दोन-दोन पारितोषिके राज्यस्तरावर आणि विभागीय स्तरावर दिली जातात.

अधिक माहिती 


वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर  विज्ञान रंजन कथा स्पर्धा

कोणासाठी? : सर्वांसाठी

विज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हा भाषा-साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. मराठी भाषेत विज्ञानरंजन साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी विज्ञान परिषद १९७०पासून विज्ञानरंजन कथा स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेतील कथेला विषयाचे बंधन नाही. या स्पर्धेत दरवर्षी, सर्वोत्तम दोन कथा पारितोषिकास पात्र ठरतात. वर्ष २०१६पर्यंत या स्पर्धेची पारितोषिके सौ. सुनंदा वामनराव देसाई यांच्या नावे देण्यात येत होती. वर्ष २०१७ पासून ही पारितोषिके वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर यांच्या नावे देण्यात येत आहेत.

अधिक माहिती 


राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा

कोणासाठी? : सर्वांसाठी

परिषदेच्या २०१६ या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून, मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक (शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालय) आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी, विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते. दोन्ही गटांसाठी सर्वोत्तम तीन एकांकिकांना पारितोषिके दिली जातात. त्याचबरोबर स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीसाठीही काही पारितोषिके दिली जातात.

अधिक माहिती