परिषदेच्या २०१६ या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून, मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक (शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालय) आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी, विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते. दोन्ही गटांसाठी सर्वोत्तम तीन एकांकिकांना पारितोषिके दिली जातात. त्याचबरोबर स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीसाठीही काही पारितोषिके दिली जातात.
या स्पर्धेचे आतापर्यंतचे विजेते..