मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम परिषद आपल्या मुखपत्राद्वारे १९६७ सालापासून करत आहे. ‘मराठी विज्ञान परिषद वार्तापत्र’ या नावाने जानेवारी १९६७ ते मार्च १९६८ या काळात सुरु असलेले हे मासिक एप्रिल १९६८ पासून ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या नावाने प्रसिद्ध होऊ लागले. सध्या वर्षभरात ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’चे ११ मासिक अंक आणि सुमारे १५० ते १७५ पानांचा दिवाळी अंक असे १२ अंक वर्गणीदारांना पाठवले जातात. दरमहा ताज्या विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात. गंमत जंमत हे चार पानी खास मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही अंतर्भाव केला जातो.

  • उपकर्ते आणि आश्रयदाते (व्यक्ती व संस्था) यांना सदर सभासदत्व स्वीकारल्यापासून वीस वर्षांपर्यंत छापील पत्रिका निःशुल्क पाठवली जाईल.
  • हितचिंतकांना सभासदत्व स्वीकारल्यानंतर पाच वर्षांपर्यंत छापील पत्रिका निःशुल्क पाठवली जाईल. त्या नंतर या सर्वांना इ-पत्रिकेचे अंक तहहयात निःशुल्क मिळतील.
  • आपण फक्त पत्रिकेचे वर्गणीदार होऊ शकता. निव्वळ पत्रिकेच्या वर्गणीसाठी अर्ज भरण्याची गरज नाही.
पत्रिकेची वर्गणी –
किरकोळ अंकः (छापील): रू. ३०/-
दिवाळी अंकः (छापील): रू. १५०/-
वार्षिक वर्गणीः (छापील): वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा  रू. ३५०/-
तीन वर्षांसाठी वर्गणीः (छापील): वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा  रू. १,०००/-
वार्षिक वर्गणीः (ई-पत्रिका – PDF – रंगीत): वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा  रू. १५०/-

‘पत्रिका’ अंकांची झलक