विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा – २०२२ – विजेते 

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेतील विजेत्यांची नावे व त्यांनी सादर केलेले प्रकल्प हे पुढीलप्रमाणे आहेत. या सर्व विजेत्यांना परिषदेच्या, एप्रिल महिन्यात होणाऱ्या वर्धापनदिनी पारितोषिके दिली जातील.

सर्व विजेत्यांचे परिषदेतर्फे अभिनंदन…


बाळाला अंगावरचे दूध पाजणाऱ्या मातांसाठी शक्तिधारी न्यूट्रिबारची निर्मिती आणि त्याचे मूल्यमापन
(Formulation and evaluation of power packed nutribars for lactating women)

– चौधरी खतिजा खातून
(प्रिंसिपाल के.एम.कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई)


अनुवांशिक व्याधींचे शिशुवयातच निदान करण्यासाठी वापरता येणाऱ्या, नखांवर आधारलेल्या पद्धतीचा पडताळा
(A proof of concept on nail metabopsy for the early detection of inherited metabolic disorders (IMDs))

– कृतिका खुंटेटा, अमेय हेबळे आणि अरिबा नदीम
मार्गदर्शनः प्रा. निलेश कुमार शर्मा
(डॉ.डी.वाय.पाटील बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फर्मेटिक्स इंस्टिट्यूट, पुणे)


पाण्याचे साठे प्रदूषित करणाऱ्या जडधातूंचा शोध घेण्यासाठी, ‘बोंबील’ या माशातून मिळवलेल्या जीवाणूंचा वापर
(Use of Photobacterium leiognathi PR2KSJ1 isolated from Harpadon nehereus to detect heavy metal pollution in water bodies)

– साक्षी कुंभार, पार्थ आरोलकर आणि केओला कपितान
मार्गदर्शनः डॉ. जॉयलीन मॅस्करेन्हस
(विल्सन कॉलेज, मुंबई)