१. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.
२. विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.
३. विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे.
४. वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे
हे उद्देश साध्य करण्यासाठी परिषद, मध्यवर्तीद्वारे तसेच विविध विभागांद्वारे नानाविध उपक्रम करीत असते. शहरांमध्ये आणि खेडयांमध्ये, विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी परिषद काम करते. परिषदेतर्फे दिव्यांगांसाठी उपक्रम घेतले जातात. समाजातील सर्व व्यक्तींमध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करणे, तसेच त्यांना परिषदेच्या कामात सहभागी करून घेणे, अशा रीतीने परिषदेची कामे चालतात. परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेचे साडेतीन हजारांहून अधिक सभासद आहेत. परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत मिळून साठापेक्षा अधिक ठिकाणी, तर महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, पेडणे, निप्पाणी व बेळगाव या पाच ठिकाणी विभाग आहेत. या विभागांद्वारे मध्यवर्तीकडून आखलेले, तसेच अनेक स्वतंत्र कार्यक्रम वर्षभर घेतले जातात.
उद्देश | व्यवस्थापन | माजी अध्यक्ष | अधिवेशनांचे अध्यक्ष | सन्मान्य सभासद | मिळालेले पुरस्कार | परिषदेची घटना आणि नियम | वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल