अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी विज्ञान अधिवेशन घेण्यात येते. (या विज्ञान अधिवेशनास पूर्वी २००४ सालापूर्वी अखिल भारतीय विज्ञान संमेलन म्हटले जात असे.) नामांकित मराठी भाषिक शास्त्रज्ञ या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून परिषदेतर्फे निवडले जातात. अधिवेशनाच्या अध्यक्षांचे भाषण हे या अधिवेशनांचे वैशिष्ट्य मानले गेले आहे. विविध विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्ती/संस्था यांचा अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात येतो. परिषदेतर्फे दिली जाणारी पारितोषिके तसेच पुरस्कार या अधिवेशनात प्रदान केले जातात. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात, चर्चासत्रे, परिसवांद, व्याख्याने, कथा-कथन, शास्त्रज्ञांशी वार्तालाप, आदींचा समावेश असतो. अधिवेशनाला जोडून शैक्षणिक सहल आयोजित केली जाते. परिषदेचे विभाग असलेल्या ठिकाणी अधिवेशन आयोजित केले जाते.


वर्धापन दिन

परिषदेची स्थापना २४ एप्रिल १९६६ रोजी झाली आहे. त्यानुसार दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी विज्ञान भवनात परिषदेचा वर्धापन दिन विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. या वेळी परिषदेतर्फे देणाऱ्या विविध पुरस्करांचे वितरण केले जाते. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात महनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींस या कार्यक्रमांत सन्मान्य सभासदत्व अर्पण करण्यात येते.

या वर्षी परिहदेचा सत्तावन्नावा वर्धापनदिन दि. ३० एप्रिल २०२३ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा वृत्तांत पुढे वाचा >>


राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन

मराठी विज्ञान परिषदेतर्फे पहिले बाल विज्ञान संमेलन १९९५ साली संपन्न झाले. त्यानंतर दर तीन वर्षांनी हे संमेलन राज्यपातळीवर भरविण्यात येऊ लागले. या संमेलनात स्वतः केलेले प्रकल्प, विद्यार्थ्यांकडून सादर केले जातात. सहभागी विद्यार्थ्यांना कृतिसत्राद्वारे विज्ञानातल्या विविध विषयांची अनुभूती मिळवून दिली जाते. या संमेलनासा जोडून एका शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. हे बाल विज्ञान संमेलन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भौगोलिक विभागात चक्रीय पद्धतीने आयोजित केले जाते.


मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी

विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानातील उच्चशिक्षणाच्या संधींविषयी आणि  उच्चशिक्षण देणार्‍या विविध शैक्षणिक संस्थांविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र) आणि गणित या विषयांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. प्रत्येक विषयातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करतात. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळते.


सन्मान्य सभासदत्व

दरवर्षी एक विषय निवडून त्या विषयाच्या विविध पैलूवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. हा कार्यक्रम परिषदेच्या वार्षिक सभेच्या दिवशी घेतला जातो.