विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेतील विजेत्यांची नावे व त्यांनी सादर केलेले प्रकल्प हे पुढीलप्रमाणे आहेत. या सर्व विजेत्यांना परिषदेच्या, एप्रिल महिन्यात होणाऱ्या वर्धापनदिनी पारितोषिके दिली जातील.

सर्व विजेत्यांचे परिषदेतर्फे अभिनंदन…


खुणांच्या भाषेचे, इतरांना समजू शकेल अशा भाषेत रूपांतर करणाऱ्या हातमोजांची निर्मिती
(Development of intelligent and interactive glove for sign language translation using Flex sensors)

– दिव्या भोसले, शाहिद खान आणि इस्माइल शेख, मार्गदर्शन : प्रा. शबाना चोपदार (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, खांडोळा, गोवा)


लोहाच्या ऑक्साइडच्या अतिसूक्ष्मकणांचा, मक्याच्या रोपाच्या वाढीसाठी पोषक पदार्थ म्हणून वापर
(Role of Fe2O3 Nanoparticles as a Micronutrient for Growth of Maize Plant)

– सानिका माने, मार्गदर्शन : डॉ. अरुणा भोसले (श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)


कचऱ्यातून मिळवलेल्या कायटिनच्या वापराद्वारे जमिनीच्या सुपिकतेतील वाढ
(Sustainable approach to enhance soil fertility and using chitin hydrolysate obtained from microbial management of chitin rich waste)

– आर्य पेडणेकर, हर्ष जाधव आणि सेजल जोशी, मार्गदर्शन : डॉ. राधिका बिरमोळे (विल्सन महाविद्यालय, मुंबई)