मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणा-या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे. सातव्या वर्षासाठी यंदा ११ अभियंत्यांकडून प्रवेशिका आल्या. त्यातील पुण्याच्या विनग्रो ॲग्रिटेक प्रॉडक्ट प्रा. ली.चे श्री. मयूर पवार यांची रु. १०,०००/- रकमेच्या पुरस्कारासाठी निवड झाली. श्री. पवार यांनी भरड धान्यातील तेलाचा अंश ९० टक्क्याने कमी करून त्यापासून खाद्य पदार्थ बनवले व ते बचत गटाच्या महिलांना विकायला दिले.
या स्पर्धेसाठी प्रा. जे. बी. जोशी, श्री. अ. पां. देशपांडे आणि श्री. मकरंद भोंसले यांच्या निवड समितीने काम केले.