महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा’ घेतली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी (गणितासह) संबंधित कोणताही प्रकल्प या स्पर्धेसाठी पाठवता येतो. स्पर्धेसाठी आलेल्या प्रकल्पांतून तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करून, त्यासाठी प्रत्येकी रु. १२,००० इतक्या रकमेचे तीन पुरस्कार देण्यात येतात. हे प्रकल्प ज्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले असतील, त्या तज्ज्ञांनाही रु. २,००० इतक्या रकमेचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. […]