Careers in Basic Sciences / मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी

“मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी” हा कार्यक्रम २०१४ पासून घेण्यात येत आहे. या मार्गदर्शन वर्गात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) विषयांचे  विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यावर्षी हा वर्ग दिनांक १२ मे २०२४ रोजी घेण्यात येणार  आहे.

 

‘Careers in Basic Sciences’

The “Careers in Basic Sciences” program will be held by Marathi Vidnyan Parishad on May 12, 2024.

Since April 2014, Marathi Vidnyan Parishad has run a programme called “Careers in Basic Sciences” to enlighten students about prospects for higher education in the basic sciences and various educational institutions offering higher education.

This course covers mathematics, physics, chemistry, and biology (botany and zoology). Students are guided and get their questions answered by subject experts. Students can interact with the experts in person through this program.

Parents or guardians are also eligible to participate in this course.
Fees : Rs. 200/ per person
Last Date of registration: 6th May 2024

 

मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी

मराठी विज्ञान परिषदेद्वारे दिनांक १२ मे २०२४ रोजी “मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी” हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या शक्यता आणि उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी हा कार्यक्रम एप्रिल २०१४ पासून मराठी विज्ञान परिषद चालवत आहे.

या मार्गदर्शन वर्गात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) समाविष्ट आहे. यात विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. या कार्यक्रमांत विद्यार्थी विषयतज्ज्ञांशी वैयक्तिकरित्या संवाद साधू शकतात.

विद्यार्थ्यांचे पालकदेखील या मार्गदर्शन वर्गात सहभागी होऊ शकतात.

नोंदणीची अंतिम तारीख: ६ मे २०२४
शुल्क : रु. २००/- प्रति व्यक्ती